महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,77,681

बाजींद भाग ३५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5969 3 Min Read

बाजींद भाग ३५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ३५ वस्ताद काकाचे हे बोल ऐकताच सखाराम बोलला..

काका…ही पेटी बघा….आम्ही साधी गरीब लोक…कशाला राजकारणात पडतोय. जे पाहिल. ज्याने है दिल ते तुम्हाला सांगितल…खंडोबाची आन मी खोटे नाही बोलत..

पण काका खंडोजी मेला तर काय त्याचे भूत होत काय आमच्यासोबत…?

शक्यच नाही ओ..माणसासारखा माणूसच होता, किती साधा आणि सरळ…..

गप्प बसा…..काका ओरडले…..
आय माहिती काय आहे खंडोजीबद्दल तुम्हास्नी…..या हातानी लहानाचा मोठा केलाय, कुस्ती शिकवली हत्यारे शिकवली आहेत मी…..

पण कर्तव्यापुढे हिंदवी स्वराज्यात कोणालाही मान नाही….

असे म्हणत वस्ताद काका बोलू लागले…..

ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती.
जनावरांची भाषा अवगत असणाऱ्या बाजींदच्या तावडीतून प्रत्यक्ष आमच्या बहिर्जीनी जर आम्हाला वाचवले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो..

जीवना-मरणाच्या दारात आम्ही सारे ज्याच्यामुळे उभे होते तो मस्त लग्नाच्या बोहल्यावर आनंदाने उभा होता..!

पण खुद्द बहिर्जी नाईक आमच्या सोबत होते त्यामुळे पुढे महासागर जरी आला असता ती विजय आमचाच होता….

एक राजकारण घडले त्या रात्री…..

यशवंतमाचीच्या जगलात गस्तीवर असलेल्या मावळ्यांच्या हाती यशवंतमाची पैलवान लागले…भीमा जाधव आणि त्याचे सहकारी.

त्यांना कैद करुन मावळ्यांनी आमच्या छावणीत बहिर्जी नाईकांच्या समोर आणले.

घाबरलेल्या भीमाने यशवंतमाचीचा सरदार मला करणार असाल तर मी तुम्हाला माचीत घुसायची वाट दाखवतो असे म्हणाला. आणि त्याने दाखवलेल्या वाटेने मराठ्यांची सारी सेना यशवंतमाचीचा मार्ग त्या काळोख्या आधारात चालू लागली..

खंडोजी आणि सावित्री विवाहाच्या बंधनात अडकल्याचीही बातमी भीमाने आम्हाला दिली होती.
ती रात्र खंडोजी साठी काळरात्र ठरली होती.

कर्तव्यात कसूर करून एका स्त्रीसाठी मराठ्यांच्या विरोधात शस्त्र उचलणारा
खंडोजी, बहिर्जी नाईकांच्या डोक्यातून जात नव्हता, यशवंतमाचीसारख्या
छोट्याश्या राज्याला स्वराज्यात आणायला इतका अवधी कसा जातोय याची
उत्तरे महाराजांना हवी होती.

त्यामुळे खुद्द बहिर्जी नाईकांनी या मोहिमेत स्वताहून भाग घेतला होता.

नाईक स्वता मोहिमेत असले कि मावळ्यांना प्रत्यक्ष शिवछत्रपती सोबत
असल्याचा अनुभव येत असे…त्यामुळे जवळपास विजयाची माळ आमच्याच
गळ्यात पडणार असे वाटत होते.

यशवंतमाचीच्या आत आम्ही सारे पोहचलो.

काही कस्न राजे येसाजीरावाना कैद करायची ही योजना आखली होती.

आत किती फौज आहे याची बित्तंबातमी भीमाने अगोदरच आम्हाला दिली होती.

मध्यरात्र उलटून गेली होती आणि त्या किरै रात्रीत साखरझोप घेणाऱ्या
यशवंतमाचीत मराठ्यांची पहिली आरोळी घुमली…..
हर हर महादेव…छत्रपती शिवाजी महाराज की जय ……

मराठ्यांच्या आरोळीने झोपलेल्या माणसांच्या अंगावर विस्तू पडून दचकून जाग यावी अशी यशवंतमाची जागी झाली.

शिर्के मंडळी सुध्दा युद्धाला तयार झाली.
हजारभर मराठे विरुद्ध कित्येक शिर्के मंडळी आता एकमेकाविरुद्ध तुटून पडणार होती…पण एवढ्या काळात मराठ्यांनी यशवंतमाचीची प्रेधा उडवणे सुरु केले होते.

कित्येक घरे जाळून टाकली होती, जीव वाचवून कित्येक लोक रस्त्यावरून धावत होते.

मराठ्यांच्या फौजेचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या कुटुंब काबिल्याला कधीही प्राणदंड
दिला जात नसे ….कित्येक शिर्के मंडळी रस्त्यावरून धावू लागली..

सारी यशवंतमाची भीतीने थरथर कापत होती…

दरम्यान यशवंतमाचीच्या बालेकिल्ल्यातून शूर शिक्यांची चिवट सेना नदीला पूर यावा तश्या त्वेषाने हातात नंग्या समशेरी घेऊन बाहेर पडल्या….

क्रमशः बाजींद भाग ३५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment