महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,77,766

बाजींद भाग ३३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6066 4 Min Read

बाजींद भाग ३३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ३३ वस्ताद काकांनी महाराजांच्या आज्ञेचा कागद सरकारी दफ्तरात जमा केला आणि सोबत २ हशम घेऊन
सखाराम च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

बैलगाड्या भस्न बियाणे, नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम आणि धनगरवाडीच्या शेतकर्याना
कायमस्वरूपी रायगडावर बाजारासाठी भाजी पाला विकायचे परवाने दिले गे……..

सखाराम व त्याचे सवंगडी मनापासून आनंदी झाले होते, आनंद ओसंडून वाहत होता……

वस्ताद काका आणि ते चौधे सोबत हशम हत्यार रायगड उतरून चीतदरवाजापासून खाली आले….

सखाराम वस्ताद काकांना बोलला…..काका ..राहदे कशाला तरास घेतासा..आम्ही निघतो पायीच…!

यावर काका बोलले…येड हायसा….तुम्हास्नी सहीसलामत गावात पोचवून टकमक खाली सरकारी
पंचनामा केल्याबिगर आता मला आणि आमच्या माणसाना जाता येणार नाही.

तुम्हाला गावात सोडतो आणि मग आम्ही येऊ मागे…चला…..

एव्हाना दुपारचा प्रहर टाळून गेला होता.

आकाशात पावसाळी ढगांनी पुन्हा गर्दी केली आणि मुसळधार सरी कोसळू लागल्या……

काथ्याच्या विणलेल्या गोंच्या पांघरुन ते सारे निघाले होते.

वस्ताद काका, सखाराम आणि त्याचे सोबती आणि सोबत दोन धारकरी होते.

वाटेत महाराजांचे अनेक गस्तीचे मेटे होतेच….सगळ्या मेटेवर वस्ताद काकांच्या ओळखीची मंडळी होती
मात्र शेवटचा एका मेटा होता ज्यात ४ धिप्पाड पण नवीन धारकरी होते त्यांनी या साऱ्यांना हटकले…

ए थांबा र ….कोण तुम्ही…कुठना आलासा..?

वस्ताद काका समोर आले आणि त्यांनी त्यांची ओळख सांगितली…पण, त्या चौघांनी त्यांची ओळख
साफ धुडकावली आणि बोल….तुम्ही कोण बी असा ओ….पावसाळ्यात रायगड चा राबता बंद असतोय
एवढ पण माहिती नाय काय स्वताला हेर म्हणून घेतायसा ते …..

त्या चौघांनी सोबत आणलेल्या धार्कार्याच्या कमरेच्या तलवारी काढ़न घेतल्या आणि सर्वाना
मोाखाली तयार केलेल्या कक्षात घेतले …!

सांगा…कोणाचे हेर तुम्ही ..?
जाताना कसे दिसला नाही …….खर सांगा नायतर गस्तीच्या टेहळणी वेळी सापडला म्हणून जीवाशी
जाशीला…….

वस्ताद काका मोठ्या आवाजात बोलले…….पौर्णिमेचा चंद्र……!

तो परवली चा शब्द ऐकताच त्या चार धारकरयाची बोबडी वळली….मागे सरकत ते बोलले…..माफ
करा …मगापासून सांगितला अस्तासा शब्द तर एवढी वेळ आली नसती….तुम्ही आणि हे दोन धारकरी
जाऊ शकता पुढ…पण या चौघांना आम्ही सोडू नाही शकत…!

दरम्यान काकांनी खूप समजावून सुधा त्या गस्तीच्या मोर्ध्यातून सखाराम सुटू शकला नाही.
शेवटी वस्ताद काका बोलले..अरे हे बहिर्जी नाईकांची खास माणसे नुकतीच महाराजांना भेटून आली
आहेत.

मला वर जाऊन फक्त परवाने आणावे लागतील…माझे ऐका सोडा यास्नी…..

पण, त्या चौघांनी यांना सोडले नाही.

ते म्हणाले माफ करा शिलेदार..पर मागच्या वेळी शिांचा जो दंगा झाला तेव्हापासून कोणी पण
तोंडी ओळखीने सोडू नका असा आदेश आहे बहिर्जी नाईकांचा..त्यामुळे परवली शब्द गडावर चालेल
इथ नाही….खरच मला माफ करा.

शिवरायांचे नाव घेताच सखारामला खंडोजी आठवला आणि त्याला आठवले की, सखाराम ने त्याला दंडावर बांधलेली चांदीची पेटी दिली होती.

त्याने क्षणात चांदीची पेटी काढली. आणि शिलेदारच्या हातात दिली. आणि परवलीचा शब्द उच्चरला.

‘चंदन…!’

हे चार शिलेदार, वस्तादकाका आणि सोबत असलेले चार धारकरी त्या परवलीच्या शब्दाने आणि यया चांदीच्या पेटीकडे पाहत डोळे मोठे करत साखरामकडे पाहू लागले..

भीतीने सर्वांगावर काटा उभा होता सर्वांच्या..!

क्रमशः बाजींद भाग ३३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment