महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,64,848

अंधेरी महाकाली च्या लेण्या

Views: 3881
2 Min Read

अंधेरी महाकाली च्या लेण्या

हा जो फोटो मध्ये दिसतोय त्याच नाव नाही लक्षात नाही पण साहेब Australia वरून आलेत. काही दिवसाच्या मुंबईच्या मुक्कामात थोडी वेगळी वाट करून मुंबई फिरतात आहेत. म्हणजे phoenix, oberoi mall, जुहू, south मुंबई, gate way वैगरे सोडून मुंबईतलं अस्सल heritage अनुभवतात आहेत. सकाळी हॉटेल वरून निघाले होते चालत चालत जोगेश्वरीला पोचले. जोगेश्वरीच्या लेण्या बघायला. तिथून चालत जाणार होते अंधेरी महाकाली च्या लेण्या बघायला. त्याला सांगितलं रिक्षाने जा तर बोलला मला काय वेळच वेळ आहे. लागलीच त्याच्या डोक्यात घारापुरी आणि कान्हेरी सुद्धा भरवून टाकल्या.

मला प्रश्न पडायचा हे इतकं मोठं वैभव आपलं पण लोकांना आकर्षित का करत नाही. हा माणूस भेटला आणि उत्तर मिळालं की इथे आकर्षित होयला सुद्धा त्याच तोळाचा माणूस लागतो. अर्धा पाऊण तासाच्या गप्पात भाऊ बरेच बोलले. आमच्या देशात बरेच काही आहे बघण्यासारखा पण हे असं पहिल्या दुसऱ्या शतकात निर्माण केलेल इतकं सुंदर असं काही नाही. हे जेव्हा हा व्यक्ती बोलला तेव्हा उगाच अभिमानवैगरे वाटून गेला. त्याला लेण्यातले कल्याणसुंदर, सारीपाट शिल्प दाखवून अजून खुश केला. जोपर्यंत समोर जे कोरलंय ते नक्की काय हे समजून घेत नाही तोपर्यंत ती दगडात कोरलेली काहीतरी कलाकृती असते. एकदा का समोरचं नक्की काय आहे समजून घेतलं की ती कलाकृती जिवंत होते. तो सगळा परिसर बोलू लागतो. आपलं वैभव दाखवू लागतो. हो पण त्या साठी तुम्ही तेवढे समर्पित असायला हवे. जपण्यासारखं बरंच आहे पण आपली मानसिकता हे टिकवण्याची नाही ह्याच नेहमी दुःख वाटतं. कधीतरी लोकांमध्ये जाणीव येईल आणि अश्या गोष्टी सुद्धा जपल्या जातील ह्याच विचाराने लेण्यातून बाहेर पडलो. मी बाहेर निघेपर्यंत तो आपला google map चालू करून निघूनसुद्धा गेला. आणि माझी सुट्टी पण मार्गी लागली.

86432917 917289148686108 9156794778136870912 o.jpg? nc cat=100& nc sid=110474& nc oc=AQlfgFitLMdIzikPtKsCkwPTsqI1bEASRfivGDnztYgmmGpxhB ff61EfTGFdJAlQRbEB0V0wgN xOSIw8llx6qM& nc ht=scontent sea1 1

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment