अंधेरी महाकाली च्या लेण्या

Discover-Maharashtra-Post | महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

अंधेरी महाकाली च्या लेण्या

हा जो फोटो मध्ये दिसतोय त्याच नाव नाही लक्षात नाही पण साहेब Australia वरून आलेत. काही दिवसाच्या मुंबईच्या मुक्कामात थोडी वेगळी वाट करून मुंबई फिरतात आहेत. म्हणजे phoenix, oberoi mall, जुहू, south मुंबई, gate way वैगरे सोडून मुंबईतलं अस्सल heritage अनुभवतात आहेत. सकाळी हॉटेल वरून निघाले होते चालत चालत जोगेश्वरीला पोचले. जोगेश्वरीच्या लेण्या बघायला. तिथून चालत जाणार होते अंधेरी महाकाली च्या लेण्या बघायला. त्याला सांगितलं रिक्षाने जा तर बोलला मला काय वेळच वेळ आहे. लागलीच त्याच्या डोक्यात घारापुरी आणि कान्हेरी सुद्धा भरवून टाकल्या.

मला प्रश्न पडायचा हे इतकं मोठं वैभव आपलं पण लोकांना आकर्षित का करत नाही. हा माणूस भेटला आणि उत्तर मिळालं की इथे आकर्षित होयला सुद्धा त्याच तोळाचा माणूस लागतो. अर्धा पाऊण तासाच्या गप्पात भाऊ बरेच बोलले. आमच्या देशात बरेच काही आहे बघण्यासारखा पण हे असं पहिल्या दुसऱ्या शतकात निर्माण केलेल इतकं सुंदर असं काही नाही. हे जेव्हा हा व्यक्ती बोलला तेव्हा उगाच अभिमानवैगरे वाटून गेला. त्याला लेण्यातले कल्याणसुंदर, सारीपाट शिल्प दाखवून अजून खुश केला. जोपर्यंत समोर जे कोरलंय ते नक्की काय हे समजून घेत नाही तोपर्यंत ती दगडात कोरलेली काहीतरी कलाकृती असते. एकदा का समोरचं नक्की काय आहे समजून घेतलं की ती कलाकृती जिवंत होते. तो सगळा परिसर बोलू लागतो. आपलं वैभव दाखवू लागतो. हो पण त्या साठी तुम्ही तेवढे समर्पित असायला हवे. जपण्यासारखं बरंच आहे पण आपली मानसिकता हे टिकवण्याची नाही ह्याच नेहमी दुःख वाटतं. कधीतरी लोकांमध्ये जाणीव येईल आणि अश्या गोष्टी सुद्धा जपल्या जातील ह्याच विचाराने लेण्यातून बाहेर पडलो. मी बाहेर निघेपर्यंत तो आपला google map चालू करून निघूनसुद्धा गेला. आणि माझी सुट्टी पण मार्गी लागली.

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here