ब्रम्हा, गणेश आणि विष्णू, वाई –
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील वाई येथे पुरातन मंदिरांचा जणू खजिनाच आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. त्यापैकी चंडिका मंदिर आणि शिवमंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. मात्र, इतर अनेक मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून काही मंदिरांचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत.
असेच एक पुरातन हेमाडपंती मंदिर वाई धरणाच्या पायथ्याशी असल्याचे दिसून येते. या परिसरात जवळच पत्र्याचे एक छोटे मंदिर उभारून त्यामध्ये ब्रम्हा, गणेश आणि विष्णू यांच्या प्राचीन मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. ब्रम्हदेवाची मूर्ती खंडित अवस्थेत असून तिचे चारही हात तुटलेले आहेत. गणपतीची सुंदर प्रतिमा शेंदूराने आच्छादलेली आहे. तसेच, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेली विष्णूची सुंदर मूर्तीही येथे पाहायला मिळते.
या ठिकाणी पूर्वी एखादे मंदिर असावे आणि कालांतराने ते नष्ट झाल्यामुळे या मूर्ती येथे आणून ठेवण्यात आल्या असाव्यात. तसेच, वाई धरणाच्या निर्मितीमुळे काही पुरातन मंदिरे पाण्याखाली गेली असण्याची शक्यता आहे. त्या मंदिरांतील मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी येथे आणून प्रतिष्ठापित करण्यात आल्या असाव्यात.
वाई परिसरातील हा पुरातन वारसा आजही इतिहासाच्या अनेक अनुत्तरित खुणा जपून आहे.
Photo – Amit Pazare
- मराठेशाहीच्या सेवेत सलग सहा पिढ्या चिटणीस (चित्रे) घराणे
- मालेगाव किल्ला : १८१८ मधील इंग्रजांच्या हल्ल्याची साक्ष देणारे दुर्मीळ रेखाटन
- छत्रपती शाहू महाराज आणि आवजी कवडे व मार्तंड मंदिराचा जीर्णोद्धार
- फ्रेंच वृत्तपत्रातून नोंदवलेले शिवछत्रपतींचे गौरवचरित्र इ. स. १७८४
- पिवळी मारबत… शंभर वर्षांहून अधिक जुनी नागपूर शहराची परंपरा!
