रणदुल्लाखान

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 7
5 Min Read

रणदुल्लाखान –

“यावेळी मोगलांचा सरदार रणदुल्लाखान होता“. सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी या अनमोल ग्रंथात ” black platform” [काळा चबुतरा] अर्थात महादेव कोळी चबुतरा” च्या अनुषंगाने प्रथम रणदुल्लाखानाचा उल्लेख आला . डॉ गोविंद गारे त्यास मोगलांचा सरदार असे आपल्या साहित्यात नोंद करतात. रणदुल्लाखानाचे उल्लेखामुळे या काळा चबुतरा या ऐतिहासिक रक्तरंजित घटनेवर अनेक समकालीन घटनाक्रम यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे त्यामुळे विस्तृत इतिहासास उजाळा मिळेल असे वाटते. अन १६२९ ते १६३७ हा घटनाक्रम अभ्यासाला असता अनेक विषयांचा उलगडा समोर येतो.

रणदुल्लाखान मोगलांचा सरदार होता याचा अर्थ असाच होतो कि डॉ गोविंद गारे साहेब यांचे संशोधन लेखन पुढे सातत्याने कार्यरत ठेवने आपले सर्वांचे काम आहे व ते आपल्याला निश्चितच पूर्ण करावे लागणार आहे .
रणदुल्लाखान मोगलाचा सरदार होता कि आदिलाशहाचा ?
रणदुल्लाखान आदिशहाचा सरदार यास काय आधार आहे हे पण अभ्यासले शोधले पाहिजे.
जुन्नर प्रांत निजामशाहीच्या राज्यात आहे तर रणदुल्लाखानाचे नाव का येते ?

मोगल-आदिलशहा तहामुळे रणदुल्लाखान या आदिलाशहाचे सरदाराचे नाव ”कोळी चबुतरा” घटनेशी निगडीत येते.
रणदुल्लाखान आदिलशहाचा सेनापती तर मोगलाचा सेनापती कोण ?
मोगलांचा सेनापती खानजमान व शाहिस्तेखान ?
खानजमान व शाहिस्तेखान या दोघानाही शिवनेरीसह जुन्नर प्रांत जिंकण्याची जबाबदारी मोगल बादशहानने जबाबदारी दिली.
असे अनेक प्रश्न समोर येतात त्याची उत्तरे आपण शोधलीच पाहिजे…
कदाचित मला हे प्रश्न पडलेत तुम्हालाही अवश्य पडतीलच ,पण आपण शोधल पाहिजे, वाचल पाहिजे, लिहिल पाहिजे, चला तर डॉ गोविंद गारे साहेबांचा वारसा जोपासुया , पुढे चिरंतर चालवूया. गारे साहेबांनी निर्माण केलेल्या मार्गाचा महामार्ग बनवूया.

who is the “Randullaakhan” –
रणदुल्लाखान हा अँबीसिनियातून आलेला एका गुलामाचा वंशज होता. दक्षिण भारतात आल्यावर तो आदिलशाहीची चाकरी करू लागला.शाहाजीमाहाराज व रणदुल्लाखान यांनी एकमेकाना संकटाच्या काळात मदत केली. भातवडीच्या [ १६२३] लढाईत आदिलाहाचा पराभव झाला असताना मलिक अंबर यानी फरादखान व रणदुल्लाखान या दोन्ही पितापुत्राना कैद करून निजामशाहीपुढे उभे केले. तेव्हा शाहजी राजे भोसले यांच्या मदती मुळे या दोन सरदाराना जीवनदान मिळाले.

शाहजी महाराजांनी स्वातंत्र मिळविण्यासाठी मोगल व आदिलशाही विरोधात माहुलीच्या किल्य्यावर जो संघर्ष केला त्यात त्यांचा पराभव झाला असताना देखील रणदुल्लाखानाच्या मध्यस्तीने शाहजी महाराज याना आदिलाशाहीमाध्ये मानाचे स्थान मिळाले.
ref- स्वराज्य निर्माते शाहजी महाराज –लेखक डॉ नीरज साळुंखे पान न. ३६
रणदुल्लाखान मरण पावल्यावर शाहजी महारांजाचा विजापुरमधील गट कमकुवत होणे साहजिकच होते.
पान न. ८३
शेवटी शके १५६५ त [ १६४३ ] रणदुल्लाखान दुखण्याने वारला. सदुसष्ट साली शहाजीने विरभद्राकडून यल्लारी तालुका घेतला.
ref जयराम पिंडेकृत राधामाधवविलासचंपू – सं प्र.वि.का.राजवाडे
khan-i-Zaman’s division had been equally successful in the junnar district and kokan. A Bijapur contingent under Randullakhan co-operated with him according to new treaty.
Ref – History of Aurangajeb – sir Yadunaath sarkar
येथुन रणदुल्लाखान इ.स. १६४३ च्या सुरुवातीस परतला व मे ते जुलै १६४३ च्या कालात रहिमतपुरी मृत्यू पावला .
ref- मालोजीराजे आणि शहाजीमहाराज – वा.सि बेंद्रे पान न. ५४८
He could no more expect employment under the mogal empire, but he was free enterto service of bijaapur .
Shahaji in service under bijaapur. Shahaji was recived with great honour by the Adilshaahi sultan and the statesmaen of that court like randullakhan.
Ref book. The life of Shivaji maharaj founder of the Maratha Empire
Auther- by N.S. Takakhav
Wr by K. A. Kelusakar

मोगल आदिलशाही तहाप्रमाणे शाहाजीने आदिलशाहाच्या चाकरीत जाण्याचे व आपल्या हाती असलेले गड देण्याचे नाकारले. साहजिकच खानजमानला साहाजीच्या पाठलागार्थ धावणे प्राप्त झाले. भर पावसाच्या समयी शाहाजी लोहगावला व खानजमान भीमेच्या पलीकडे अशी परिस्थिती होती. पाउस कमी होताच खांजामान यास रणदुल्लाखानाने मदत करावी म्हणून आदिलशहाने हुकुम पाठविला .
संदर्भ बुक ..मालोजीराजे आणि शाहाजीमहाराज
– वा. सी. बेंद्रे पान ४१७

“ १० जुलूस १०४६ हि. { २९ आक्टोबर ते १० आक्टोबर १६३७ } जेव्हा खानजमान बादशाहकडून परत आपल्या गोटांत आला तेव्हां त्याला बातमी लागली कि, शाहाजी आदिलशाहाच्या नोकरीत जाण्याचे नाकारीत असून त्याने जुन्नर व इतर गड बादशाही अंमलदाराचे हाती देण्याला नाकारले आहे. म्हणून आदिलखानाने {आदिलाशाहा } रणदुल्लाखानाचे हाताखाली सैन्य देवून आदिलशाहने गड गेन्यास व शहाजीचा बिमोड करण्याकरिता त्यास मोगली सैन्याचे मदतीकरिता पाठविले आहे.
ref बुक . मालोजीराजे आणि शाहाजीमहाराज – वा. सी. बेंद्रे पान न. ३९०

इकडून खान जमान हा शहाजहान पादशहाचे तर्फेने शहाजी भोसले याजवर नेमिला होता. खानजमान याचा हात सुलभपणे व ढिलाईने शाहाजी भोसले याजवर चालू होता.याजकरीता रणदुल्लाखान आदिलाशहाकडून खानजमान याचे मदतीवर नेमिला.
त्या नंतर खानजमान हा मुर्तजा निजामशहासहीत दौलताबादकडे चालू झाला. रणदुल्लाखान व शहाजीराजे भोसले आदिलशहा पादशाहचे चाकरीवर चालते झाले.
From the letter of Adilkhan to Shah jahaan after rec eiving the trety.-Md.Nama, p.95. Bad.-Nama,p.57

संदर्भ – विजापूरची आदिलशाही- बसातीन-उस–सलातीन

संकलन By गौतम डावखर

Leave a Comment