महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,24,401

छत्रपति शिवाजी महाराज यांचे मोगलाकडील राजकारण भाग २

Views: 5
8 Min Read

!!! छत्रपति शिवाजी महाराज यांचे मोगलाकडील राजकारण भाग २ !!!

राजे अचलोजीराव जाधवराव यांच्या वंशज शाखा
१) राजे अचलोजीराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे द्वितीय पुत्र असुन त्यांना चार पुत्र होते.
राजे विठोजीराव , राजे देवराव , राजे सृजनसिंह उर्फ संताजीराव आणि राजे राणोजीराव‌.
राजे देवराव हे राजे अचलोजीराव यांचे द्वितीय पुत्र असून राजे अचलोजीराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे द्वितीय पुत्र होते..

२) राजे अचलोजीराव याना चार पुत्र विठोजीराजे , देवरावराजे , सृजनसिंहराजे , राणोजीराजे.

३) विठोजीराजे हे अचलोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र असुन यांचे विद्यमान वंशज सिंदखेडराजा परिसरातील मेहुणा राजा येथील राजे जाधवराव आहेत.. यांचा उल्लेख इ सन १६३३ घ्या जाधवराव घराण्याच्या वाटणी पत्रात अचलोजीराजे यांच्या वाटणीत वडील पुत्र म्हणून येतो.

राजे लखुजीराव यांच्या मृत्यूनंतर अचलोजीराजे यांची ३०००जात व १००० स्वाराची मनसब त्यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजीराजे यांच्या नावे आल्याचे मोगल फारसी साहित्यात उल्लेख आढळतात. विठोजीराजे यांना २००० जात व १००० स्वाराची मनसब होती. हे राजे लखुजीराव जाधवराव यांच्या मृत्यूनंतर नंतर चुलत आजोबा भुतजीराजे,चुलते बहादुरजीराजे, चुलतभाऊ ठाकुरजीराजे व चुलत पुतणे रतनोजीराजे उर्फ रुस्तुमराव (यशवंतरावराजे पुत्र) यांच्यासोबत लष्करी मोहिमेवर असत. विठोजीराजे हे इ सन १६३५ च्या कोल्हापूर- मीरज रोडवरील एका लष्करी मोहिमेवर ठाकुरजीराजे यांच्यासोबत असताना त्यांना मोगलांच्या आक्रमणात वीरमरण आले. त्यांना पुत्र नसल्यामुळे त्यांचे कनिष्ठ बंधू देवरावराजे यांचे तृतीय पुत्र गिरजोजीराजे यांना दत्तक घेण्यात आले आणि यांची विद्यमान वंशजशाखा मेहुणाराजा येथील राजे जाधवराव आहेत.

इ सन १७१९-२० च्या अस्सल सुरतमजलिस या कागदावरुन विठोजीराजे यांचे वंशज तसेच जाधवराव घराण्याच्या प्रत्येक शाखेतील वंशज पुढे छत्रपति थोरले शाहु महाराजांकडे सामील झाल्याचे स्पष्ट होते. इ सन १६६५ साली भाऊबिरादराच्या राजीनाम्यात रायभानवंश जवळखेडकर, सुर्यभानवंश उमरदकर, विठोजीवंश मेहुणेकर, देवराववंश आडगावकर व किनगावकर यांचा वतनातुन हिस्सा नाहीसा झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र सरंजाम प्राप्त होता.. परंतु पुढे विठोजीराजे यांचे नातु राणोजीराजे बिन गिरजोजीराजे आणि किनगावकर बहादुरजीराजे बिन रुस्तुमराव यांनी इ सन १७१९ साली जाधवराव घराण्यातील वाटणीची मागणी छत्रपति थोरले शाहु महाराज यांच्याकडे केल्यानंतर खुद्द छत्रपति थोरले शाहु महाराजांनी यावरील कागदपत्रे तपासून सुरतमजलिस कागद तयार करून इ सन १६३३ च्या जाधवराव घराण्याच्या वाटणी पत्रातील दत्ताजीराजे यांच्या वंशजांचा एक हिस्सा, अचलोजीराजे यांच्या वंशजाचा एक हिस्सा, देऊळगावकर यांचा एक हिस्सा व किनगावकर यांचा हिस्सा परत कायम करुन दिला. यासंदर्भात मोडी पत्र उपलब्ध आहेत.

४) देवरावराजे हे अचलोजीराजे यांचे द्वितीय पुत्र असुन बंधु विठोजीराजे यांच्या मृत्यूनंतर यांना १००० जात व ६०० स्वार्थाची मनसब प्राप्त झाली.यांचा उल्लेख पुढे बर्याच मोहिमेत आढळतो.तसेच इ सन १६६५ च्या भाऊबिरादरांच्या राजीनाम्यात यांचा #देवराववंश_आडगावराजा असा उल्लेख आढळतो. तसेच पुढे छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात महाराजांकडे सामिल झालेल्या यादीत देवरावराजे उर्फ देवजी यांचा उल्लेख आढळतो. यांचा मृत्यू इतिहासास ज्ञात नाही.

देवरावराजे यांचे विद्यमान वंशज आडगाव राजा व घनसावंगी येथील राजे जाधवराव आहेत. देवरावराजे याना चार पुत्र : त्र्यंबकजीराजे , पाराजीराजे , गिरजाजीराजे व निळकंठराजे.
त्र्यंबकजीराजे यांचे विद्यमान वंशज आडगाव राजा येथील राजे जाधवराव आहेत.
पाराजीराजे यांचे वंशज बद्दल माहिती मिळत नाही…

गिरजाजीराजे हे देवरावराजे यांचे ज्येष्ठ बंधु विठोजीराजे (मेहुणाराजा) याना दत्तक गेले व यांचे विद्यमान वंशज मेहुणाराजा येथील राजे जाधवराव आहेत.
निळकंठराव राजे यांचा इ सन १७२५ साली आपल्या भाऊबंदासोबत वतनावरुन वाद झाल्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराजांनी त्यांना घनसावंगी येथे देशमुखी व पाटीलकी दिली आणि त्यांचे विद्यमान वंशज घनसावंगी येथील राजे जाधवराव /जाधवराव देशमुख आहेत… तसेच निळकंठराव राजे यांचा घनसावंगी येथे एक शिलालेख देखील प्राप्त झाला आहे. निळकंठरावराजे हे छत्रपति थोरले शाहु महाराजांकडे सुरुवातीपासूनच होते आणि त्यांच्या खास सरदारांपैकी एक सरदार म्हणून होते.या संदर्भात शाहु रोजनिशीत व शाहु दप्तरात पत्र उपलब्ध आहेत.
त्र्यंबकजीराजे याना विठोजीराजे, राघोजीराजे, सटवाजीराजे, खेलोजीराजे व भगवंतरावराजे पाच पुत्र होते. यांचे विद्यमान वंशज आडगाव राजा येथील राजे जाधवराव आहेत.

विठोजीराजे यांचे पुत्र रामरावराजे व संताजीराजे यांना वाघोली (पुणे) येथे वतन मिळाले होते.. विठोजीराजे यांना छत्रपति थोरले शाहु महाराज यांनी वाघोली येथील इनाम दिल्याचे पत्र उपलब्ध आहे. यावरून हे छत्रपति थोरले शाहु महाराज यांच्या पदरी असल्याचे स्पष्ट होते.
रामरावराजे याना चार पुत्र कमळोजीराजे, पिलाजी राजे /पिराजीराजे, हैबतराव राजे व चंदोजीराजे. ** कमळोजीराजे यांचे वंशज शाहु नगरी म्हणजे सातारा येथे वास्तव्यास होते.. कमळोजीराजे हे छत्रपति थोरले प्रतापसिंह महाराज यांचे मावस मेहुणे होते. छत्रपति थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या कारकिर्दीत कमळोजीराजे यांचे पुत्र जगदेवरावराजे यांनी पराक्रम गाजवल्याचे पत्र उपलब्ध आहेत.तसेच छत्रपति थोरले प्रतापसिंह महाराज यांना कैद झाल्यानंतर जगदेवरावराजे यांचे पुत्र आनंदरावराजे यांनी इ सन १८४० साली इंग्रजांना “जी-२४” निवेदन सादर केल्याची नोंद आढळते.

पिलाजीराजे प्रथम याना तीन पुत्र श्रीपतराव राजे, शिवाजीराजे व चंदोजीराजे उर्फ चंगोजीराजे. चंगोजीराजे याना पुत्र पिलाजीराजे द्वितीय असुन यांचे वंशज वाघोली, वाडी व नांदेड (पुणे) येथील राजे जाधवराव आहेत… पिलाजीराजे जाधवराव व त्यांचे दोन चुलते श्रीपतराजे व शिवाजीराजे हे छत्रपति थोरले शाहु महाराजांच्या दरबारात मानाचे स्थान ठेवून होते. पिलाजीराजे जाधवराव हे शाहु महाराजांच्या काळात “सुभेदार व त्यांचे परराष्ट्रमंत्री” म्हणून काम करत असल्याचे पत्र उपलब्ध आहेत.

छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे खाजगी सल्लागार व मराठा साम्राज्याचे परराष्ट्रमंत्री सुभेदार पिलाजीराव (द्वितीय ) जाधवराव यांचे चुलते श्रीपतराव राजे व शिवाजीराजे यांचा शाहु काळात सरंजाम एकत्रित होता…
हैबतराव राजे यांचे वंशज आडगाव राजा येथे आहेत…
चंदोजीराजे यांची माहिती मिळत नाही.
त्र्यंबकजीराजे यांचे पुत्र राघोजीराजे, सटवाजीराजे, खेलोजीराजे व भगवंतरावराजे यांचे विद्यमान वंशज आडगाव राजा येथेच वास्तव्यास आहेत..

द बा महाजन यांनी राजे जाधवराव घराण्याची बखर संपादित करताना देवरावराजे याना यशवंतराव राजे यांचे पुत्र दाखवले आहे आणि यशवंतराव राजे याना राजे लखुजीराव यांचे पुत्र दाखवले आहे… परंतु देवरावराजे हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे द्वितीय पुत्र अचलोजीराजे यांचे द्वितीय पुत्र असुन यशवंतराव राजे हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत… द बा महाजन यांनी देवरावराजे यांचे वंशज आडगावकर आणि यशवंतराव राजे यांचे वंशज जवळखेडकर व उमरदकर राजे जाधवराव यांचे कागदपत्रे न तपासल्या मुळे त्यांची गफलत झालेली दिसून येते

५) सृजनसिंहराजे उर्फ संताजीराजे हे अचलोजीराजे यांचे तृतीय पुत्र असून मराठा स्वराज्याचे प्रसिद्ध सरसेनापती धनाजीराव जाधवराव हे याच वंशज शाखेतील असुन यांच्या विद्यमान वंशज शाखा माळेगाव बुद्रुक (बारामती) , बोरगाव (पुणे) व मांडवे (सातारा) येथील राजे जाधवराव आहेत.. या शाखेतील सरसेनापती धनाजीराजे जाधवराव व त्यांचे तीन्ही पुत्र संताजीराजे,चंद्रसेनराजे व शंभुसिंहराजे पुढे मराठा साम्राज्याचे सरसेनापती राहिलेले आहेत…फक्त सरसेनापती चंद्रसेनराजे यांचे प्रधान बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबत वाद झाल्यामुळे मराठा साम्राज्य सोडुन निजामाकडे जावे लागले. पुढे यांचे पुत्र रामचंद्रराजे उर्फ वीरसिंह हे छत्रपति थोरले शाहु महाराज यांच्यासोबत संधान बांधून काम करत होते हे सिद्ध झाल्यानंतर त्यांना निजामाने भर दरबारात उकळते तेल टाकुन ठार मारले. म्हणजे यांनी देखील छत्रपतिसांठीच विरमरण पत्करल्याचे सिद्ध होते.

६) राणोजीराजे यांची माहिती मिळत नाही.

७) अशाप्रकारे राजे लखुजीराव जाधवराव यांचे द्वितीय पुत्र राजे अचलोजीराव यांच्या विद्यमान वंशज शाखा पुढीलप्रमाणे :- मेहुणाराजा, आडगाव राजा, माळेगाव बुद्रुक, बोरगाव (पुणे), मांडवे (सातारा), सातारा, वाघोली,वाडी,नांदेड (पुणे) व घनसावंगी.

८) अशाप्रकारे राजे लखुजीराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराजे जाधवराव यांच्या वंशजशाखेप्रमाणेच द्वितीय पुत्र अचलोजीराजे यांची वंशजशाखा छत्रपति घराण्याकडे संधान बांधून मराठा स्वराज्यासाठी तलवार गाजवल्याचे स्पष्ट होते… (क्रमशः)

Rajenaresh Jadhavrao

Leave a Comment