छत्रपती संभाजी महाराज आणि अण्णाजी दत्तो –
छत्रपती संभाजी महाराज आणि अण्णाजी दत्तो यांचे संबंध आधी सुद्धा चांगले नव्हते . साधारण 1661 मध्ये अण्णाजी दत्तो यांना वाकनिशी म्हणून शिवाजी महाराजांनी नेमले लगेच त्यांची सुरनिशी म्हणून बढती केली. अण्णाजी दत्तो यांनी 2/5 अशी कर वसुली अमलात आणली. म्हणाजे शेतकरी उत्पांनातली दोन भाग सरकार जमा “सारा” म्हणून आणि उरलेले तीन भाग शेतकरी कडे. सतत फिरतीवर असल्यामुळे त्यांचे राज्यात चांगले लक्ष असे. सुरते लूट, हुबळी वर हल्ला आणि पन्हाळा घेताना कोंडोजी फर्जंद बरोबर साथ अशी त्यांची मैदानी कामगिरी होती.
1)छत्रपती संभाजी महाराज जसे वयाने मोठे होऊ लागले तेंव्हा त्यांनी सैन्य कडे लक्ष दिलेच शिवाय दप्तरी विशेष महसूल कारभारात लक्ष घालू लागले. तेंव्हा जुन्या लोकांना विशेषतः अण्णाजी दत्तो यांनी त्यांचा हस्तक्षेप पटला नाही.
2)राजाराम महाराजांचे लग्न झाल्या नंतर शिवाजी महाराज आजारी पडले . त्यांच्या तब्येत आणखी खराब झाल्यावर आजारी पडल्याची बातमी रायगड बाहेर जाऊ नये म्हणून पहारा आवळला. शत्रूकडे बातमी पोहचू नये हा एवढाच हेतू नव्हता तर संभाजी महाराजांना याची बातमी लागू नये हा मूळ उद्देश .त्यावेळी मोरोपंत बीदर भागात होते तर अण्णाजी दत्तो चौल (म्हणाजे रायगड जवळ)आणि हंबीरराव कराडला होते. नंतर मोरोपंत ना तातडीने बोलावून घेतले असावे.
3)छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू ची बातमी छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून लपवली आणि त्यांच्या अंत्यसंस्कार सुद्धा उरकून टाकला . यात सोयराबाई यांना सल्ला मसलत द्यायला अण्णाजी दत्तो यांचा पुढाकार होता. अंत्यसंस्कार साबाजी भोसले (नागपूरच्या रघुजी भोसले चे पूर्वज) आणि राजाराम महाराज नी पार पडले.संभाजी महाराजांना पासून दूर ठेवले
4) छत्रपती संभाजी महाराजांनी बंड करू नये म्हणून मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो संभाजी महाराजांना पकडण्यास रायगडावरून कोल्हापूर मार्गे रवाना झाले. पण हंबीररावांनी त्यांना रोखून कैदेत टाकले.
5)छत्रपती संभाजी महाराजांनी इतके होऊन पुन्हा माफ केले.पण त्याच वेळी कवी कलश आणि संभाजी महाराज यांची मैत्री लक्षात आल्यावर आता आपल्याला पुन्हा मनाचे स्थान मिळणे शक्य नाही हे अण्णाजी दत्तो च्या लक्षात आले. शिवाय अण्णाजी यांना पुन्हा सुरानिशी पद मिळाले नव्हते.पुन्हा मुजुमदार या पदावर नियुक्ती केली.
6)औरंगझेब च शहजादा अकबर जेंव्हा दुर्गादास राठोड बरोबर स्वराज्यात मराठ्यांची मदत मागायला आला .तेंव्हा अण्णाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद यांनी सोयराबाई च नावाने पत्र लिहून शहजादा अकबर ल छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध कटात मदत मागितली . पण हा डाव उधळला.
7) त्या आधी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज वर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. पण तो अयशस्वी झाला. त्यावेळी विषप्रयोग करणारे हस्तक ने मात्र नाव न सांगताच जीव सोडला. पण संशयाची सुई ही अण्णाजी दत्तो याकडेच होती.
8)अण्णाजी दत्तो ने मोरोपंत, बाळाजी आवजी, सोमजी दत्तो , शामजी नाईक पुंडे,हिरोजी फर्जंद शिवाय अनेक मात्ताबर मराठा साम्राज्याचे लोकं फोडली.
9) संभाजी महाराज आणि अण्णाजी दत्तो घरा मधील एका स्त्री चे प्रेम प्रसंग आणि नंतर त्या स्त्री ची आत्महत्या याला कोणताही समकालीन पुरावा नाही.(अगदी छावा कादंबरी मधील प्रसंग सुद्धा रंगवला आहे). पण छत्रपती संभाजी महाराजांच्य रंगेल प्रकरणात एकही पुरावा नाही. नंतर ऐकलेल्या गोष्टीवर लोकांनी अनेक गोष्टी 18 आणि 19 व्य शतकात विश्वास ठेवून अनेक भडक कथा रंगवल्या.
संदर्भ
वा.सी. बेंद्रे संभाजी महाराज.
संभाजी ने माझी चिता पेटवली पाहिजे : डी जी गोडसे यांचा लेख
अजिंठा FB Page
