विष्णुची शक्तीरूपे

विष्णुची शक्तीरूपे

विष्णुची शक्तीरूपे –

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्ती रूपातील शिल्पे भारतीय मूर्तीशास्त्राला मोठे योगदान आहे असे अभ्यासक मानतात. हातातील आयुधे शंख चक्र गदा आणि पद्म यांचा जो क्रम आहे त्यानुसार विष्णुची २४ नावं आहेत. या २४ नावांसाठी २४ शक्ती आहेत. यातील उजव्या बाजूने म्हणजेच प्रदक्षिणा क्रमाने गदा, शंख, चक्र आणि डाव्या खालच्या हातात पद्म अशा विष्णुला वासुदेव संबोधले जाते. या छायाचित्रात याच क्रमाने आयुधे धारण केलेली जी स्त्री प्रतिमा आहे तीला लक्ष्मी असे संबोधले जाते (देवता म्हणून असलेली लक्ष्मी मूर्ती वेगळी).  या मूर्तीचे शास्त्रा प्रमाणे केलेले विश्लेषण वेगळे. पण एक ललित कलाकृती म्हणूनही ही लोभस वाटते.(विष्णुची शक्तीरूपे)

उजवा हात ज्या पद्धतीने गदेवर टेकवला आहे, त्याचे लालित्य आणि गदेच्या सरळपणावर तोललेला सर्व शरिराचा भार, दूमडलेला उजवा पाय आणि रोवलेला तिरका डावा पाय, कमरेपासूनचे वरचे सर्व शरिर ९० अंशात फिरवून समोर आणले आहे जेंव्हा की पायाची दिशा वेगळी आहे. गदेच्या वरच्या टोकावर टेकवलेला पंजा हाच संपूर्ण शिल्पाचा तोल सांभाळणारा मध्यबिंदू जाणवतो.

अन्वा मंदिरावर २४ पैकी १७ शक्ती रूप शिल्पे आजही शाबूत आहेत. त्यांचे शिल्पांकन शास्त्रा सोबतच शिल्प सौंदर्य म्हणूनही थक्क करणारे आहे.अन्वा मंदिरावर २४ पैकी १७ शक्ती रूप शिल्पे आजही शाबूत आहेत. त्यांचे शिल्पांकन शास्त्रा सोबतच शिल्प सौंदर्य म्हणूनही थक्क करणारे आहे.त्यांचे शिल्पांकन शास्त्रा सोबतच शिल्प सौंदर्य म्हणूनही थक्क करणारे आहे.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here