Vasai Fort | Vasai Killa | VASAI FORT
उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला. वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टि हा सर्व परिसर समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. भौगोलिकदृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्त्वाचा ठरतो.
किल्ल्यात न्यायालय, चर्च, हॉस्पिटल वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे.
पोर्तुगिजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमांजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३७ ते १७३९ मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरतांना आजही येते.
वसई ते किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या बसेस ही उपलब्ध आहेत. वसई स्टेशनहून किल्ल्यात टमटम रिक्षा अथवा साध्या रिक्षेनेही जाता येते. स्टेशनपासून किल्ला ६ कि.मी. वर आहे.
Vasai Fort | Vasai Killa | Vasai
• शूटिंग – Pandhari / Ajay Salunkhe.
Thanks
Vinayak Parab