हिंदू राजाच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक आणि इस्लामचा कायदा

हिंदू राजाच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक

हिंदू राजाच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक आणि इस्लामचा कायदा मोडल्याबद्दल मलिक काफूरने त्यांना केलेली शिक्षा –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अमूक टक्के मुस्लिम सैनिक वगैरे तद्दन भिकार साहित्य आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा वाचले असेल याची मला खात्री आहे. ( शिवाजी महाराजांच्या सैन्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके मुसलमान लोक, फक्त तांत्रिक कारणांसाठी होते हे श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या आगामी पुस्तकात पुराव्यानिशी येईलच)  मुसलमानांचा धार्मिक ग्रंथ असलेल्या कुराणात मुसलमानांविरुद्ध काफिरांना अशा प्रकारे मदत करणाऱ्या लोकांना ‘अल-मुनाफिकून’ म्हणजे वरकरणी मुसलमान असल्याचे भासवून आतून मात्र इस्लामच्या विरुद्ध वागणारा आणि इस्लामच्या शत्रूंना मदत करणारा असे म्हटले आहे. ( कुराण २:८ आणि २:१४) असे लोक  हे काफिरांपेक्षा मोठे शत्रू आहेत, आणि त्यांना नरकामध्ये काफिरांपेक्षा कडक शिक्षा मिळणार आहेत असे कुराण सांगते (कुराण ४ :१४५)हिंदू राजाच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक.

**मुसलमानांनी काफिरांशी  मैत्री करू नये :- पवित्र कुराणाचे आदेश**

काफिरांना मुसलमानांविरुद्ध मदत करू नये असे पवित्र कुराणाचे स्पष्ट आदेश आहेत. कुराण सुरा ४ आयत १४४ काय म्हणते पहा :-

मूळ अरबी पाठ :-

” या अय्युहा अल्लाथीना अमानु ला तत्तखीथू अल काफिरीना अवलिया मीन दूनी अल मुमिनीना अतुरीदूना अन ताज अ आलू लिल्लाही अलेयकूम सुल्तानान मुबीनान ”

मराठी अर्थ :-

इस्लाम मानणाऱ्यांनो , मुसलमानांना सोडून काफिरांशी मैत्री करू नका. (असं करून ) अल्लाहला तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची संधी द्यायची तुमची इच्छा आहे का ?”

अशा लोकांना मृत्यूनंतर काय शिक्षा दिली जाते याचा उल्लेख याच्या पुढच्या आयतीत आला आहे. कुराण सुरा ४ आयत १४५ काय म्हणते पहा :-

मूळ अरबी पाठ :-

“इन्ना मुनाफिकीना फी अल दरकी अलसफली मीना अलन्नारी वालां ताजिदा लहुम नसिरान”

मराठी अर्थ :-

(अशा प्रकारे इस्लामच्या कायद्याच्या विरुद्ध वागणारे) मुनाफीक नरकाच्या सर्वात खोल खाईत जातील आणि त्यांना तिथे मदत करणारे कोणीही मिळणार नाही.

**सुफी अमिर खुसरो ने खजाईन अल फुतुह मध्ये केलेले उल्लेख**

अमीर खुसरो, सुफी वगैरे नावं कानी पडली की  शायरी-बियरी मध्ये बुडालेल्या आपल्याकडील काही जणांचे  पायातले बळ एकदम जाते आणि ते ‘वाह वाह ! क्या बात है !” वगैरे म्हणून लाळघोटे पणा करायला लागतात. असल्या लोकांनी  खरंतर अमीर खुसरो काय किंवा अन्य कोणचेही साहित्य वाचलेले नसते. आम्ही सर्वधर्म समभाव पाळतो म्हणजे आम्ही कोणीतरी फार भारी आहोत अशीच या लोकांची धारणा असते. या भोळ्या लोकांना कोणत्याच धर्माची यत्किंचितही माहिती नसल्यामुळे ते असे वागतात. असो.

अल्लाउद्दीन खिलजीने मिळवलेल्या विजयांचे गुणगान करणारे एक पुस्तक अमीर खुसरोने लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव ‘खजाईन- अल-फुतुह’ म्हणजे  ‘विजयाचे खजिने’ या पुस्तकात त्याने अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याच्या दक्षिणेतील स्वारीचे वर्णन केले आहे. (खजाईन अल फुतुह, मूळ फारसी पाठ, पृ. १६१ पासून पुढे ) त्यात तो असं लिहितो :-

” दक्षिणेतील एका हिंदूं राजाच्या सैन्यात काही मुसलमान होते. हिंदूंच्या सैन्यात नोकरी करून त्यांनी “मुसलमानांविरुद्ध काफिरांना मदत करू नये ‘ या इस्लामच्या कायद्याचे उल्लंघन करून गंभीर गुन्हा केला होता.  (अमीर खुसरो येथे वर दिलेली कुराणातील सुरा ४, आयत १४४ मधील काही भाग उद्धृत करतो. त्याच्या मूळ फारसी पुस्तकात आयती मधील “ला तत्तखीथू अल काफिरीना अवलिया मीन दूनी अल मुमिनीना” हे शब्द त्याने उद्धृत केले आहेत. त्या पानाचे छायाचित्र सोबत जोडले आहे.)  या गुन्ह्याबद्दल मलिक काफूरने हिंदूंना जाऊन मिळालेल्या मुसलमानांच्या गळ्यात शिक्षा म्हणून लाकडाचे जू  अडकवले. पण कालांतराने या मुसलमानांना आपला गुन्हा कबूल केल्यानंतर काफूरने त्यांना कुराणातील कलमा म्हणायला सांगितला आणि  ते मुसलमानच आहेत आणि त्यांना कुराणातील कलमा म्हणता येतो याची खात्री झाल्यावर त्यांना माफ करून त्यांच्या मानेवर घातलेले लाकडाचे जू काढून टाकले. ”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अल्प संख्येने केवळ तांत्रिक कारणासाठी असलेल्या काही मुसलमान व्यक्तींचे अवास्तव उद्दात्तीकरण काही लोक करतात , पण कुराणातील कायद्यानुसार काफिरांना मुसलमानांविरुद्ध मदत करणे किंवा काफीरांशी मैत्री करणे हा गंभीर गुन्हा मानला गेला आहे आणि त्यासाठी नरकवासाची शिक्षा सांगितलेली आहे !

बहुत काय लिहिणे ? आपण सुज्ञ असा !

टीप :- या विषयी सविस्तर माहिती श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या आगामी पुस्तकात लवकरच …

संदर्भ :-
१) खजाईन अल फुतुह (मूळ फारसी पाठ )- अमीर खुसरो देहलवी
२) कुराण
३) The Campaigns Of Allauddin Khilji – Muhammad Habib

चित्रें :-
१) अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर
२) अमीर खुसरो याच्या खजाईन अल फुतुह या मूळ फारसी पुस्तकातील पान
३) कुराण, सुरा ४, आयत १४४

हिंदू राजाच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here