महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्याचा धाक

By Discover Maharashtra Views: 2959 3 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्याचा धाक –

आपल्या गावातील स्त्री सोबत बदअमल केला म्हणून रांझे गावच्या बाबाजी बिन भिकाजी गुजर या मुकादमाचा(पाटलाचा) महाराजांनी तात्काळ चौरंगा केला. कायदा कडक असला की जनमानसांत त्याची भिड राहून लोक पुन्हा तो गुन्हा करावयास धजत नाहीत. रांझ्याच्या पाटलाला जानेवारी १६४६ साली शिक्षा करण्यात आली.त्यानंतर मात्र शिवकाळात अशी फारशी उदाहरणे पुन्हा सापडत नाहीत. ११ डिसेंम्बर १६५२ रोजी मोसे खोऱ्यातील आपल्या मुलकी अधिकाऱ्यांना लिहिल्या एका पत्रातून मात्र अस एक प्रकार आपल्या लक्षात येतो.(छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्याचा धाक)

मोसे खोऱ्यातील तपे माजकुरीच्या सात गावचा मुलकी कारभार रंगोबा त्र्यंबक वाकडा हा कुलकर्णी बघत होत. ह्याचवेळी गावातील विधवा ब्राह्मण स्त्री सोबत त्याने सिंदलकीचा(अतिप्रसंग करणे) गुन्हा केला. याबाबत गावातील लोकांना माहिती झाली आणि हिं खबर महाराजांपर्यंत गेली.

महाराजांनी त्या रंगोबा ला पकडून आणायचे आदेश दिलेलं होते. मात्र आपली तक्रार महाराजांकडे गेलीय, आता शिवाजी महाराजांचे लोक येणार आपल्याला पकडून नेणार या भीतीने आपलं वतन सोडून हा कुलकर्णी गावातून पसार झाला. आणि थेट जावळीच्या मोर्यांच्या आश्रयाला गेला. पण छत्रपती शिवरायांच्या न्यायव्यवस्थेची खात्री आणि शिक्षेबद्धलची ही भीती इतकी प्रचंड होती की, रंगो त्रिमल वाकडा घाबरूनच जावळी मुक्कामी मेला.

११ डिसेंम्बर, १६५२ रोजी लिहिलेले हे पत्र, मोसे खोऱ्यातील सरदेशमुख, कारकून, देशमुख, देशकुलकर्णी, मोकदम, खोत, मिरासदार याबसर्वांना उद्देशून आहे. या पत्रांनुसार, सिंदलकीचा गुन्हा करून पळून गेलेल्या आणि नंतर मयत झालेल्या रंगोबा त्रिमल वाकडा याची ६ गावची कुलकर्णी रिकामी झालेली आहे. या रंगोबा ला अपत्य नाहीय, आणि त्याचे भाऊबंद सुद्धा दुष्काळात आधीच मेलेले आहेत, त्यामुळं या सहा गावची आणि मौजे तोव या अजून एका कुलकर्णी नसलेल्या गावची अशी एकूण सात गावची कुलकर्णी सरकारातुन अमराजी नीलकंठ करंजकर याना दिले आहेत. यासाठी ५० होण शेरणी घेऊन त्यांना तसा पत्र (खुर्दखत) दिलेले आहे. त्यानुसार सात गावची मिराशी(वंशपरंपरागत हक्क) दिलेले आहेत यावर अंमलबजावणी करणे यासाठी पुन्हा नवीन खुर्दखताचा आग्रह न धरता, पुढील नूतनीकरण करणे.

एखाद्या गावचा मुलकी अधिकारी पद रिक्त झाल्यास त्यावर तात्काळ दुसरा अधिकारी नेमून कार्यालयीन कामात कोणताही खंड पडू नये याची काळजी महाराज वारंवार घेत होते हे यामधून दिसून येते. सोबतच रांझ्याच्या पाटलांला केलेली शिक्षेमुळ लोकांत कोणत्या प्रकारचा धाक निर्माण झाला होता हें सुद्धा इथं यातून स्पष्ट होत.

– महेश तानाजी देसाई

Leave a comment