महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,604

थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग १

By Discover Maharashtra Views: 5094 4 Min Read

थळ घाट(कसारा घाट,नाशिक) ते भोर घाट(खंडाळा घाट,लोणावळा) परिसरातील घाटवाटा व किल्ले

ठाणे,नाशिक व नगर या जिल्ह्यांच्या सिमा कळसूबाईच्या डोंगरांत एकीमेकींना भिडतात.कळसूबाईच्या दक्षिणेस हरिश्चंद्रगडाचे पहाड आहेत.तेथ पासून फोंडा घाटा पर्यंत सह्याद्रीच्या अत्तुच्च्य शिखरांच्या व पठारांच्या प्रदेशाला घाटमाथा म्हणतात या दरम्यान असंख्य घाटवाटा आहेत.घाटमाथ्याहून कोकणात उतरण्यासाठी ज्या घाटवाटा आहेत.त्यातील काही घाटवाटा आजही वापरात आहेत.थळ घाट(कसारा घाट),म्हाळशेज घाट,खंडाळा उर्फ भोर घाट,ताम्हिणी घाट,वरंधा घाट,बावडा घाट,फोंडा घाट असे आजही वापरात असणारे मुख्य घाट आहेत.चौल व सोपारा या प्राचिन बंदरांना जोडणारा नाणेघाट हा पुर्वीचा सर्वाधिक वापरला जाणारा घाटमार्ग होता.नाणा व गुना या दोन आधिकार्यांनी किंवा ठेकेदारांनी परस्परांशी स्पर्धा करुन दोन घाट बांधले त्यातील नाणेघाट प्रथम पुर्ण झाला म्हणून सरकार दरबारी तो प्रथम जाहिर झाला अशी दंतकथा आहे.ती खरी की खोटी यात आपण पडायच नाही मात्र नाणेघाट हा आधिक सोईस्कर आहे.मी नाशिकजवळीळ वाघेरा या किल्ल्याजवळील सत्ती घाट जो दमण व जव्हार परिसरातून नाशिक परिसरांत डोंगररांग ओलांडून वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता ते खंडाळा घाटा पर्यंतच्या परिसराची माहिती या लेखात सामिल करतो आहे.तेव्हा त्याची सुरुवात हि अंबोली घाटाजवळून जवळून केली आहे.

१)कोंकणातील डहाणू,वाडें,सोपारा,चौल या परिसरातील दळणवळण हे अनुक्रमे अंबोली घाट,अव्हाट घाट,शिर घाट,थळ घाट(आताचा कसारा घाट) या घाटांतून होत असे हे सर्व घाट घाटमाथ्यावर नाशिक परिसरात वर चढतात.

२)कोंकणातील कल्याण व शहापूर भागातील दळणवळण हे अनुक्रमे पिंप्री(बोर घाट),तोरण घाट,मेंढ्या घाट,चेंढ्या घाट या घाटांमार्गे होत होते. हे सर्व घाट घाटमाथ्यावर ‘आकोला’ तालुक्यातील परिसरांत वर चढतात.

३)कोंकणातील मुरबाड परिसरातील दळणवळण हे अनुक्रमे माळसेज घाटामार्गे होत होते.हा घाट घाटमाथ्यावर ‘ओतूर’ परिसरात घाटमाथ्यावर चढतो.
या परिसरात हरिश्चंद्रगडाच्या आसपास अनेक छोट्या घाटवाटा आहेत.जसे नळीची वाट,सादले(सादडे) घाट,करपदरा घाट आहेत.

४)कोंकणातील मुरबाड व वैशाखर्यावरुन दळणवळणासाठी ‘नाणेघाट’ हा घाट वापरात होता.हा घाट घाटमाथ्यावर जुन्नर परिसरात वर चढतो.

५)कोंकणातील मुरबाड,पुलु -सोनावळे ‘कोपोली घाट,दर्या घाट,साकुर्डी घाट,’मार्गे दळणवळण केले जात होते.हे घाट घाटमाथ्यावर घोडें,आंबेगाव परिसरात वर चढतात.

६)कोंकणातील नेरळ,पनवेल या परिसरातील दळणवळण भिमाशंकर घाटातून होत होते.हा घाट घाटमाथ्यावर खेड व कडूस परिसरांत घाटमाथ्यावर चढत होता.(याच परिसरात अहुपे घाट आहे.)

७)कोंकण परिसरातील ‘कर्जत’ भागातील दळणवळण हे ‘कोलिंबा घाट,सावळ घाट,कुसूर घाट’ या घाटांमार्गे होत असे.हे घाट घाटमाथ्यावर खेड व कडूस,आंध्रचे खोरे,नवलाख उंबरे परिसरांत वर चढतात.(या परिसरात पाली घाट, १८ नंबरची वाट, फ्यानदी घाट, नाखिंदे घाट , कौल्याची धार, वाजंत्री घाट आदी घाटही आहेत.)

८)कोंकणातील खालापूर परिसरातील दळणवळण हे कोंकण दरवाजा(राजमाची) परिसरातून होत होते.हा घाट घाटमाथ्यावर नाणें परिसरात चढतो.

९)कोंकणातील खोपोली परिसरातील दळणवळण हे ‘भोर घाट’ आताचा खंडाळा घाट मार्गे होत होते.हा घाट कार्ले व लोणावळें परिसरात घाटमाथ्यावर चढतो.

१०)त्याच्या पलिकडील वस्ती म्हणजे ‘पेण’ या परिसरातील दळणवळण हे उंबरखिंड परिसरातून होत होते.यांतील घाटवाटा या लोहगड परिसरात घाटमाथ्यावर चढत होत्या.

पुढेही वाघजाई घाट,ताम्हण घाट,लिंग्या घाट,देव घाट,कुंभा घाट,कावळ्या घाट,शेवत्या घाट,मढ्या घाट,भोपे घाट,वरंध घाट,कामथा घाट,ढवळ्या घाट,आंबेनळी उर्फ रडतोंडी घाट,हातलोट घाट,आंबोली घाट,तिवरा घाट,कुंभारली घाट,मळा घाट,कुंडी घाट,अंबा घाट,विशाळगड घाट,अणुस्कुरा घाट,बावडा घाट,फोंडा घाट,नरदावा घाट,घोटगीचा घाट,रांगणा घाट,आंबवली घाट,राम घाट,केळ घाट,तिन्नई घाट असे असंख्य घाट आहेत.
बाकी घाटवाटा पुढील लेखात कधीतरी…!

थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग २ येथे वाचा

संकलन
नवनाथ आहेर
बा रायगड परिवार

Leave a comment