महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सोमवंशी क्षत्रिय घराणे

By Discover Maharashtra Views: 3532 3 Min Read

सोमवंशी क्षत्रिय घराणे, दावलजी सोमवंशी –

दावलजी सोमवंशी हे छत्रपती शाहुमहाराजांचे सरलष्कर होते. बाजीराव प्रधानाने दावलींसोबत लढायांमध्ये सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सोमवंशी घराण्याचा मुळ उगम पुरुरवा यांचा होय. सोमवंशी क्षत्रिय घराणे हे वंशसुचक आडनाव धारण करतात. राजपूत क्षत्रिय च्या ३६ मुळ शाखा असून क्षत्रिय  सोमवंशी हे नऊ शाखेत विभागले गेले आहेत. त्यातील एक मुख्य शाखा प्रतापगढ ( उ.प्र ) येथील अत्रय गोत्र ही होय. या प्रतापगढचा उल्लेख रामायण व महाभारतात आढळतो.

प्रतापगढ येथील क्षत्रिय सोमवंशी घराणे १६२८ ते १६८२ साली नावारुपाला अाले. प्रताप बहाद्दूर यांच्या नावावरून याला प्रतापगढ नाव पडले.पुढे हे प्रतापगढ संस्थान म्हणून उदयास आले व १९४९ ला भारतात विलीन झाले. या सोमवंशी घराण्यात आनेक पराक्रमी व कर्तबगार पुरुष जन्माले आले. बाजीराव पेशवे यांना उत्तरेकडील मोहीमेत या सोमवंशी घराण्याचा सबंध अाला.

या सोमवंशी घराण्यातील दावलजी सोमवंशी याने बाजीराव पेशवे यांना अत्यंत महत्वाची अशा पालखेडच्या लढाईत साथ दिली.पालखेडची लढाई व त्यानंतर निजामाशी तह यात मराठ्यांच्या इतिहासता महत्वाच स्थान आहे.ही लढाई बाजीरावाच्या युध्दनेतृत्वाचा एक महत्वाचा पैलू होता. यात आनेकांचा सहभाग असलातरी दावलजी सोमवंशी याचा कार्यभाग ही महत्वाचा.याच सोमवंशी घराणंयातील शाखा मौजे जावळे येथे आहे. सोमवंशी जाहागिरदार म्हणून हे आळखले जातात. यांचा राहता वाडा म्हणजे एक भव्य गढीच होय. हे सोमवंशी जाहागिरदार य‍ांनी सन १८५७ साली जावळ्याची जहागिरदारी चांगली गाजलीच.

१८ व्या शतकापूर्वीचा  सोमवंशी जहागिरदार वाडा याची साक्ष देत आजही येथे भक्कमपणे उभा आहे. जवळे येथील पद्माजीराव यांना सन १८५७ च्या उठावानंतर दोन वर्षांनी म्हणजेच ३१ जानेवारी १८५९ साली इनामी जहागिरी मिळाली. यापूर्वी जवळे हे  संस्थानशी जोडले गेले . पुणे व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे गाव असल्याने राज्य कारभाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणूनच जवळे हे गाव पाहीले जायचे. जवळ्याच्या जहागिरदारांचा मुळ पुरुष दामाजीराव होय . मुलगा

पद्मजीराव यांना सरदेशमुखी मिळाल्यानंतर आनंदराव कृष्णराव सोमवंशी यांना २ एप्रिल १८७२ ला जहागिरी मिळाली. जहागिरदारांचा वाडा म्हणून ओळखला जाणारा ४ एकरावरील वाडा १८ व्या शतकापूर्वी बांधला असावा. जवळा गावाच्या उत्तरेला असणारा वाडा जहागिरदारीचे मुख्य कार्यालय होते. मुख्य दरवाजा रुंद, भव्य प्रवेशद्वार, शंभर मीटर लांब-रुंद असलेली ही कचेरी त्यावेळी होती. वाड्याच्या भेवती दार बुरुज भव्य होते ते आजही भक्कम आहेत. वाड्याच्या उजव्या बाजूला बुरुजातून मध्य भागातून खास एक तळघर पाडलेले आहे. या तळघराच्या भुयारातून जाता येत होते. पूर्व दिशेला नदी तर, दक्षिणेस कोर्टाची भिंत तर पश्चिमेला गुरांसाठी जागा होती. समोर घोड्यांचा पागा होता.

History of maratha sardar family.

Leave a comment