आज्ञापत्र आणि शिवराय

परराष्ट्रीय धोरण | शिवरायांची बलस्थाने भाग ५ | आज्ञापत्र आणि शिवराय

आज्ञापत्र आणि शिवराय –

आज्ञापत्र आणि शिवराय . अमात्यांनी शिवरायांच्या १३प्रकारच्या हालचालींचे वर्णन आज्ञापत्रात केले आहे. त्या १३हालचाली पुढील प्रमाणे:-

१)कोण्हावरी चालोन जाऊन:- बाजी घोरपडे, इखलासखान, बेहलोलखान, इ.

२)छापे घातले:- जुन्नर, नामदारखान, नगर, पेण

३)परस्परे कलह लावून दिले:- शहजादा मुअज्जम व औरंगझेब, बहादूरखान व दिलेरखान

४)मित्रभेद केले:- जसवंत दळवी आणि शिर्के

५)डेरिस सिरोन मारामारी केली:- शाइस्तेखान

६)येकांगी करून पराभविले:- अफजल खान

७)कोणासी स्नेह केले:- कुतुबशहा(कुत्बशाह), मालोजी घोरपडे

८)कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले:- मिरझा राजे जयसिंग व औरंगझेब

९)कोण्हास आपले दर्शनास आणवीले:- नाईकजी पांढरे, खराटे, सिद्दी हिलाल, छत्रसाल बुंदेला, हेन्री ऑक्सइंडेन

१०)कोण्हास परस्परे दगे करविले:- बहादूरखान व दिलेरखान, मुअझ्झम व दिलेरखान

११)जबरदस्तीने स्थल बांधून पराक्रम करून आकलीले:- मोऱ्यांच्या पराभव करून भोवतालचे मकरंदगड, चांभारगड, चंद्रगड, रायगड हे किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले. प्रतापगड हा गिरिदुर्ग बांधला. स्वराज्याची आग्नेय दिशा रक्षण्यासाठी सुपे परगणा ताब्यात घेतला

१२)जलदुर्ग:- सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, इ.

१३)दुर्घट स्थळी नौका मार्गे प्रवेशले:- बसरूर

संदर्भ:- रामचंद्रपंत अमात्यकृत शिवराजनीती :- डॉ केदार फाळके Dr-Kedar Phalke.

Prathamesh Khamkar Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here