शिवराई भाग १४

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 3810
1 Min Read

शिवराई भाग १४…

श्री १२३१ अंकित शिवराई काल आपण पहिली. १२३१ सन असलेली एक दुर्मिळ शिवराई आज आपण पाहू आणि ती म्हणजे ‘श्री/ सन १२३१/ राजा’ असा ओळीत मजकूर असलेली शिवराई. या प्रकारच्या शिवराई वर पूर्ण मजकूर येणे फार कठीण असते बहुदा ते नाण्याबाहेरच गेलेले असते. मागील बाजूवर छत्र / पती असाच मजकूर असला तरी पुढील बाजूवरील मजकूर मात्र नेहमीप्रमाणे नाही. आपल्याला माहितीये कि शिवराई नाण्यावर ‘राजा’ या शब्दात येणार ‘रा’ हा मोडी लिपीत असतो तर इतर सर्व अक्षरे हि देवनागरी असतात (देवनागरी ‘रा’ असलेल्या शिवराई देखील आहेत पुढे दाखवेन).

सादर नाण्यावर ‘रा’ व्यतिरिक्त आणखी एक अक्षर मोडी लिपीत आले आहे आणि ते म्हणजे ‘सन’ या शब्दातले ‘स’ हे अक्षर पण ‘न’ मात्र देवनागरिच आहे. मागील बाजूवर ‘छत्र’ ऐवजी ‘छेत्र’ आपल्याला पाहायला मिळते. १० ग्रॅम्स च्या जवळ नाण्याचे वजन असून धातू तांबे आहे.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a Comment