सात मुखी टाक, अकोला

सात मुखी टाक, अकोला

सात मुखी टाक, अकोला –

अकोला पातूर रोडवर चिखल गाव परिसरातील पहाड चा परिसरात ही टाक आहे , अखंड कातळ दगडात जमिनीत कोरलेली ही मोठी टाक आहे , सात मुख ( Opening ) असलेली ही टाक आहे , सर्वात मोठे आयात आकृती मुख आहे व त्याला पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी , पायऱ्याचा विरुद्ध बाजूला आडव्या रांगेत तीन चोकोनी आकार असलेले मुख आहेत .आणि त्यांचा आजूबाजूला अन्य छोटी मुख आहेत पण टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या एकच ठिकाणी आहेत .

टाक चा परिसरातच दगडावर गोल छोटी खडे Cup Mark रांगेत केलेले दिसतात ,या खड्यात दगड ठेवून खेळ खेळला जात असावा . विदर्भात बऱ्याच लेणी मध्ये असे खेळ आढळून आले आहेत , ‘ ओळख मूर्ती शास्त्राची ‘ या व्याख्यान माले अंतर्गत डॉ.आकाश गेडाम यांनी –  ” विदर्भातील गुहा चित्रे व प्रस्तर शिल्पे ” या विषयावर व्याख्यान दिले होते त्यात त्यांनी या Cup Marks बद्दल माहिती दिली होती , कोणाला उत्सुकता असेल तर त्या व्याख्यानाची लिंक देत आहे .

चिखल गाव – शिर्ला परिसरात ही दुसरी टाक / विहीर आहे , अगदी अशीच टाक इथून 4 km वर  आहे.

एक शंका निर्माण होऊ शकते की ही टाक / पाय विहीर आहे का गुफा का ध्यान केंद्र पण जर या टाक चा मुखा जवळील भाग नीट पाहिला तर लक्ष्य येते की मुखात पाणी उतरण्यासाठी चर खोदली आहे व जवळील शेतकरी सांगतात की फक्त पहिल्या दोन पावसात टाक पूर्ण भरून जाते व चारही बाजूंनी पावसाचे पाणी टाक्यात उतरे , उन्हाळ्यात सुद्धा पाणी यात साठलेले राहते , टाक्यात आतून झरा नाही आहे ती पूर्णतः पावसाच्या पाण्याने भरते ,आत मध्ये कसलीही मूर्ती किंव्हा पिंड नाही आहे , जवळील शेतकरी त्यांचा गुरा ढोरांना यातीलच पाणी पाजतात व स्वतःही पितात.

ही दोन्ही पाय विहीर / टाक पाण्याची गरज भागवण्यासाठी छनी हातोड्याने बनवल्या गेला आहेत आणि या खोदणाऱ्याला जमिनीचे उत्तम ज्ञान असावे आणि या परिसराचा चांगलाच अभ्यास होता आणि तेव्हाच जाऊन या टाक खोदल्या गेला आहेत.

वेळात वेळ काढून आवर्जून या दोन्ही पाय विहीर पहाव्यात अशा आहेत . आपला पूर्वजांनी आपला साठी ठेवलेली ही धरोहर जपुया व राखुया .

GPRS location —-
Latitude -20.529207
Longitude – 76.942275

© Sandeep Sakhare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here