महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,529

सरदार भापकर वाडा, लोणी भापकर

By Discover Maharashtra Views: 1644 2 Min Read

सरदार भापकर वाडा, लोणी भापकर, ता बारामती –

ज्यांच्या अडनावाने हे गाव ओळखले जाते ते भापकर घराणी या गावातील. याच भापकर घराण्यातील सरदार सोनजी भापकर हे पेशवेकाळात मोठे सरदार होते. पानिपतच्या लढाईत यांनी फार पराक्रम गाजवला होता . अशा या सोनजी भापकरांचा सरदार भापकर वाडा या गावात गतवैभवाची साक्ष देत ऊभा आहे.

वाड्या जवळ गेल्यावर वाड्याची दगडी तटबंदि पाहून वाड्याच्या विस्ताराची कल्पना येते. वाड्याचे मूख्य बुरुज अर्धवट असून मुख्य प्रवेशद्वार नामशेष झाले आहे. इथून आत गेल्यावर वाड्याची चौसपी इमारत आपल लक्ष वेधून घेते. २८ फूट उंचीच्या भिंती त्यात दरुस्त करुन बसवलेला दरवाजा. सागवानी लाकडावर केलेले कोरीवकाम ,भिंतीतले कोनाडे,दिवाणखान्याची तख्तपोशी आपले स्थान टिकऊन आहेत.

वाड्यात स्वतंत्र देवघर आहे. वाड्यातील एका भुयारातून आत उतरलोकी दोन रेखीव कमानीतून पाय-या ऊतरलोकी एक मोठा तलाव दिसतो. या वाड्यात एवढा मोठा तलाव पाहील की या वाड्यात किती राबता असेल हे लक्षात येत. आनेक वाड्यांन मध्ये विहीर,कुंड असतात पण मोठा तलावच या वाड्यात पाहावयाला मिळतो आणी तोही एका भुयारातंन गुप्त पणे जाता येते. हे सहसा पाहावयास मिळत नाही.

सध्या या वाड्यात श्री अप्पासाहेब भापकर राहात असून वाड्याच डागडुजी करुन आपल वैभव सांभाळत आहेत. अप्पासाहेब गावतील एक वजनदार व्यक्तीमत्व असून आपलेपणाने सगळ्यांची विचारपूस करतात हे त्यांच्या भेटीतून जाणवल.अप्पासाहेब गावतील एक वजनदार व्यक्तीमत्व असून आपलेपणाने सगळ्यांची विचारपूस करतात हे त्यांच्या भेटीतून जाणवल.

संतोष चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment