अपरिचित इतिहासअपरिचित मावळे/स्वराज्याचे शिलेदारजीवनचरित्र

संभाजी आंग्रे | अपरिचित मावळे

संभाजी आंग्रे | अपरिचित मावळे

संभाजी आंग्रे यांनी मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी विजयदुर्गावर आपणच चढाई करावी असे ठरवून इंग्रजांनी 22 डिसेंबर रोजी कमांडर जॉर्ज बग्वेल याला विक्टरी, किंग जॉर्ज, प्रिन्सेस क्लोरीन आणि रेसोल्युशन ही जहाजे आणि तीन गलबते याशिवाय वाटण्यासाठी दोन हजार रुपये देऊन विजयदुर्गावर हल्ला करण्यासाठी पाठवले. आंग्र्यांचे आरमार बुडवणे याचा विचार करणे आणि तो प्रत्यक्षात आणणे यात खूप फरक होता. इंग्रजांना आदल्या रात्री आंग्र्यांचे आरमार विजयदुर्गाच्या गाडीत दिसले तर दुसऱ्या दिवशी त्यातील एक जहाज दिसले आणि बाकीचे आरमार कधी आणि कुठे गेले याचा पत्ता इंग्रजांना लागला नाही. सिद्धी ला विचारले तर त्याने आरमार दाभोळला आहे असे सांगितले. इंग्रजी आरमार तेथे पोहोचले तर आंग्रे यांचे आरमार कारवारला गेल्याचे समजले. या पळापळीत इंग्रजाच्या आरमाराची पुरती दमछाक झाली.

शेवटी अन्न आणि पाणी संपल्यावर सिद्धी पुढे इंग्रजांना हात पसरावे लागले. यानंतर इंग्रजांचे आरमार पुन्हा मुंबईला कुठल्याही प्रकारची लढाई न करता परतले. कमांडर बग्वेल यांनी या विषयी आपल्या वरिष्ठांना अहवाल दिला त्यात म्हटले की आपली मी अशी खातरजमा करतो की संभाजी आंग्रेच्या बंदरात आम्ही राहणे हे त्याला अपमानास्पद वाटते आणि म्हणून त्याची बंदर सोडून दूर जाणे मला भाग पडले. हे कळवण्यास दुःख होते आणि त्याचे कारण आपले सैन्य त्याच्या विरुद्ध लढण्या इतके सामर्थ्यवान नाही व त्याच्याशी लढा देण्यात आपले आरमार गुंतवून ठेवणे हे आपल्याला शक्य नाही. कारण तो जास्त बलवान असा शत्रू आहे. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला किंवा पुष्कळांना जी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. अशी खातरजमा करतो व वाचल्यावर आपली माझ्याप्रमाणे समजत होईल अशी आशा करतो.

संभाजी आंग्रे याचे आरमार बंदरात कोंडून ठेवणे ही कल्पना प्रत्यक्षात आणणे कठीण होती. जहाजांवरील अन्नधान्य आणि पाण्याचा साठा दोन महिन्यापर्यंतचा असे तो पुन्हा मिळवण्यासाठी या कोंडीतून जहाजे परत पाठवावी लागतील तसे झाले की आंग्र्यांचे आरमार पुन्हा समुद्रात संचार करू लागेल. यामुळे ही कल्पना ही आधीच्या कल्पनांप्रमाणे सोडून देण्यात आली. आंग्र्यांच्या मुलखावर हल्ला करावा तर सर्व लष्कर आणि आरमार मुंबईतून बाहेर आणावे लागेल आणि नेमका त्याच वेळी संभाजी ने मुंबई वर हल्ला केला तर ? ही भीती होती. संभाजीने इंग्रजी आणि पोर्तुगीज जहाजे लुटण्याचा धडाका सुरू केला त्याचा दरारा एवढा होता की संभाजीचे आरमार समुद्रात आहे असे कळताच इंग्रजांची गलबते मुंबईच्या आश्रयाला पळत. शेवटी इंग्रजांनी संभाजीची तह करण्याचे ठरविले परंतु संभाजी आंग्रे यांचा इंग्रजांवर बिलकुल विश्वास नव्हता. तरीही त्यांनी एका अटीवर तह करण्याचे कबूल केले आणि ती म्हणजे सर्व प्रकारच्या इंग्रजी जहाजांनी आंग्रे यांचे दस्तक घेऊन पश्चिम किनार्‍यावर व्यापा करावा. त्यांना धक्का लागू नये म्हणून वीस लाख रुपये द्यावेत परंतु या अटी इंग्रजांना मान्य नव्हत्या. आणि हा तह झालाच नाही.

संभाजी आंग्रे लुटालूट करीतच होते. आरमार आणि मालमत्ता वाढवीत होते. 14 फेब्रुवारी 1740 रोजी संभाजी आंग्रे यांनी आपल्या आरमारातील पाच गावे आणि पुष्कळ गलबते घेऊन थेट मुंबई बंदरात आपले आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडविले, तर 9 नोव्हेंबर 1740 रोजी मुंबईकर इंग्रजांची 14 मच्छिमार जहाजे आणि त्यावरील 84 खलाशी पकडून नेले. पोर्तुगीजांच्या आरमारातील गोव्यात तांदूळ भरून येणाऱ्या जहाजांवर हल्ला करून त्यास पकडले.
सततच्या दगदगीमुळे संभाजी आंग्रे यांचे 12 जानेवारी 1742 रोजी निधन झाले.
फोटो -1 संभाजी आंग्रे
2.संभाजी आंग्रे यांची समाधी विजयदुर्ग

माहिती साभार :- रवि पार्वती शिवाजी मोरे

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close