साबाजी शिंदे | Sabaji Shinde

By Discover Maharashtra Views: 3130 3 Min Read

मराठा राजवटीतील अजुन एक अनमोल हिरा साबाजी शिंदे – Sabaji Shinde

 साबाजी – Sabaji Shinde हे शिंदेंच्या फौजेतिल एक प्रमुख सरदार होते.
अब्दालिने १७५७ ला दिल्लीवर स्वारी केली. त्याचा मुकाबला करण्यासाठी मग साबाजी, राघोबादादा व मल्हाररावांच्या नेत्रत्वाखाली एक मोठी मराठा फौज दिल्लीत येवुन धडकली. पण तोपर्यंत अब्दाली वापस अफगानिस्तानकडे निघुन गेला. मग मराठ्यांनी त्याचा पाठलाग करायचे ठरवले. अशा रितीने मराठ्यांनी पंजाब, लाहोर, मुलतान, अटक अशे अब्दालिचे प्रमुख सुभे जिंकुन घेतली. मात्र अटकेवर भगवा फडकावलेले मराठे, तिथल्या हिवाळ्यातल्या थंडिमध्ये कुडकुडु लागले. शेवटी मग राघोबादादा व मल्हाररावांनी साबाजी शिंदेंच्या नेत्रत्वाखाली १५ हजाराची फौज दिली व तिथुन वापस दिल्लीकडे माघार घेतली. आता साबाजीवर अटकेपासुन- दिल्लीपर्यंतच्य इलाक्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी होती. इकडे अब्दाली काबुलमध्ये बसुन मराठ्यांचे सर्व उद्योग न्याहळत होता. त्याला स्वतःच्या मुलाचा तैमुरचा लाहोरमध्ये मराठ्यांनी उडवलेला धुवा तसेच मराठ्यांनी अटकेपर्यंत मारलेली धडक हे सर्व रुचले नाही.

आता साबाजीकडे थोडिच फौज आहे, त्याला हरवुन आपण आरामात दिल्लीपर्यंत जावू’, असा त्याचा विचार होता. या सर्वांत भर म्हणुन साबाजीने आपल्याकडच्या थोड्या फौजेनिशी अब्दालीचे सर्वात महत्वाचे ठाणे ‘पेशावर’ जिंकुन घेतले. पेशावर हातात आल्यामुळे साहजिकच
अब्दालीचा हिंदुस्तानाकडे येनारा ‘खैबर पास’ हा प्रसिद्ध मार्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. आता मात्र अब्दालिची झोप उडाली. मराठे
लाहोरपासुन अटकेपर्यंत टप्याटप्याने जिंकत होते. पेशावर हातात आल्यामुळे साबाजी आता सरळ काबुलवर येतो की काय अशी परिस्थीती निर्माण झाली. कारण, पेशावर ते काबुल अंतर होत १२० किमी म्हणजेच जेमतेम ४ ते ५ दिवसाचं. आता अब्दालिने सैन्याची जमवाजमव केली व त्याचा वजिर सरदार जहान खानाच्या नेत्रत्वाखाली २५ हजाराची मोठी फौज देवुन त्याला साबाजीच्या बंदोबस्तात पाठवले. मात्र याचाही काही उपयोग झाला नाही. त्या खैबर खिंडीमध्ये झालेल्या चकमकींमध्ये साबाजीने जहान खानाचा पार धुव्वा उडवला. परत फिरुन जहान खानाने पेशावर जवळ येवुन साबाजीला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये जहानखानाचा पुत्र मारला गेला, तो स्वतः जखमी झाला आणि त्याच्या सैन्याची तर पार दाणादाण उडाली.

एक अनमोल हिरा साबाजी शिंदे – Sabaji Shinde

जहानखानाने शेवटी माघार घेतली. अशा रितीने साबाजीने जवळ जवळ १६ महिने खैबर खिंड शर्थिने लढवली. शेवटी अब्दालीने अनेक तुर्की, इरानी, पठाणी सरदारांना एकत्र करुन ५० हजाराचे फार मोठे लष्कर जमविले व
तो स्वतःच्या नेत्रत्वाखाली सारी फौज घेवुन साबाजीवर चालुन गेला.येवढ्या मोठ्या फौजेशी साबाजीने मुकाबला करणे केवळ अशक्य होते. दिल्लीला गेलेली मराठ्यांची फौज पुढे

महाराष्ट्रात परतली होती. त्यामुळे त्याला आवश्यक अतिरीक्त मराठा फौज व रसद मिळाली नाही.
तसेच तिथल्या स्थानिक शिख सरदारांना मराठ्यांच पंजाबातलं वर्चस्व पटत नव्हत. त्यामुळे
अब्दाली आणि शिख यांच्यात अडकुण पडण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे साबाजीने सर्व
फौजेनिशी लवकर दिल्लीचा रस्ता धरला. अशा रितीने साबाजी शिंदेंनी महाराष्ट्रापासुन
हजारे कोस दुर असलेल्या अफगाणिस्तानातल्या अटक- पेशावर- पंजाब भागामध्ये मराठ्यांचा जरिपटका मोठ्या अभिमानाने
मिरवीला. पुढे काही काळ साबाजी शिंदे यांच्या नातुला म्हणजे मानाजी शिंदे यांना सरदारकी मिळाली होती

Leave a comment