महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,70,417

आमच्या संस्कृतीशी जुडलेली आमची घट्ट नाळ आम्ही कधीही सोडत नाही…

Views: 1
3 Min Read

आमच्या संस्कृतीशी जुडलेली आमची घट्ट नाळ आम्ही कधीही सोडत नाही…

आम्ही कितीही प्रगत झालो,कितीही आधुनिक किंवा आजच्या भाषेत माॅडर्न झालो तरि आमच्या संस्कृतीशी जुडलेली आमची घट्ट नाळ आम्ही कधीही सोडत नाही. आम्ही अतिशय टोकाचे विज्ञाननिष्ठ असोत वा टोकाचे सनातनी पण आमचे देव-देवता,सण-समारंभ नि आमच्या चालिरिती,पंरंपरा आजही आम्ही तितक्याच तन्मयतेने नि मन्मयतेने पुजतो, साजरे करतो. आजही मांसाहार केला तरि मंदिर नि पवित्र ठिकाणी जाण्याचे आमच्या मनात येत नाही. आजही आमच्या भगवंताच्या वेशात जरि कोणी दिसला तरि आमचे आपसुकच हात जोडले जातात. आजही कुठेही अगदी कुठेही शेंदुर माखलेल्या दगडासमोर आम्ही नतमस्तक होतो. बर्याच जणांना वाटत की आमचे देव दगडाचे आहेत..

बाबांनो आमच्या श्रध्देची,भक्तीची ताकद एवढी मोठी आहे की आमचा देव आमच्यासाठी दगडात येऊन वसतो. दगडाला देवपणाला पोहचवणारी आमची श्रध्दा नि भक्ती आहे. आम्ही कुत्र्या-मांजरांना,गाई-गुरांना पुजतो,जपतो. त्यांच्याशी भावनेने एकजुट होतो. वड,पिंपळ,लिंब,उंबर,आपटा इ.इ. असे कितीतरी वृक्ष आमच्या धार्मिक नि अध्यात्मिक जिवनात पुजनिय नि अनिवार्य आहेत. का माहितीए! कारण आमचा ईश्वर आम्हाला सांगतो की; “मी चराचरांत आहे” आमची संस्कृती चिरंतन आहे. आणि ही संस्कृती जोवर चिरंतन असेल तोवर हे प्राणी,पक्षी,वृक्षवेली आमच्या संस्कृतीसोबत चिरंतन राहतील…कारण आमची संस्कृती मातीशी घट्ट चिकटून आहे. ही संस्कृती आमची नाळ मातीशी जोडून ठेवते. म्हणूनच आमच्या विठोबाला पुजणार्या हातात ९०% लोक मातीत राबणार्या कष्टकर्यांचे आहेत. आम्ही नद्यांना माता म्हणतो. आमचा धर्म सांगतो किंवा आमच्या धर्मात पंचमहाभूतात पाणी हे एक पंचमहाभूत आहे. म्हणूनच पाणी म्हणजे जीवन आहे असे आम्ही मानतो. आजही आम्ही नदीला पुजतो,तिला साडी नेसवतो,तिची खणा नारळांनी ओटी भरतो,तिची आरती करतो कारण तिच्या जलावरच आमचे जीवन अंवलंबून आहे. मग कुणाला आम्ही अंधश्रध्दाळू वाटलो तरि चालेल पण आम्ही आमच्या त्या जीवनवरदायिनी नदीची कृतज्ञता व्यक्त करतच राहू..

आमच्यात विविध जाती आहेत,विविध उपासना पंथ आहेत,विविध दैवते आहेत,विचार विभिन्नता आहे. पण आजही ईश्वरा समोर आम्ही आदराने झुकतोच,आजही राष्ट्र म्हणून आम्ही एकत्र नांदत आहोत. आमच्यात काही दोष असतीलच ते सगळ्यात असतातच. आम्ही कधीही कुठेही निर्दोष आहोत असे मांडत नाही. पण जगाचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की आम्ही जेवढे दोष निर्दोष करत इथवर आलो आहोत तेवढे कुठल्याही धर्माला नि पंथाला आजवर जमले नाही. आम्ही वेगवेगळ्या जातीत,पंथात,उपासनापध्दतीत,विचारपध्दतीत विभागलो असलो तरी आमच मुळ एकच आहे,आमचे रक्त एकच आहे..होय आम्ही हिंदु आहोत. जगातल्या सगळ्यात प्राचीन संस्कृतीचा रक्तवारसा पिढ्या दर पिढ्या वाहवत आणणारे हिंदु. हे हिंदुपणच आमची ओळख आहे,हे हिंदुपणच आमचे अस्तित्व आहे आणि हे हिंदुपणच आमचे मुळ आहे..ते असेच चिरंतन नि अबाधित राहिल….

महेश निकम(भुंगा)

Leave a Comment