पुरातन काळातील जागृत हनुमान मंदीर, कामोठे, पनवेल

पुरातन काळातील जागृत हनुमान मंदीर, कामोठे, पनवेल

पुरातन काळातील जागृत हनुमान मंदीर, कामोठे, पनवेल –

काळाच्या ओघात आज जरी कित्येक ग्रामीण भागांचे शहरीकरणात नुतनीकरण जरी झाले असले तरी तेथील ऐतिहासिक वास्तू,वाडे व मंदीरे आपलै ऐतिहासिक अस्तित्व आजही चांगल्या प्रकारे टिकवून आहेत. पनवेल तालुक्यातिल कामोठे या भागातील पुरातन काळातील जागृत हनुमान मंदीर ची केलेली भटकःती.

मुळात पनवेल मध्ये राहावयास जरी आलो असलो की नेहमी गडकिल्ल्यांवर भटकंती साठि फिरत असतानाच तेथिल स्थानिक वाडे,मंदीरे,समाधीस्थळै यांचा शोध हा नेहमीच घेत असतो. नवी मुंबई म्हटल की ठाणे पासून पनवेल हा प्रांत हा सर्वाना चांगलाच माहीत आहे.याच पनवैल मधील कामोठे या विभागात पुणे बेंगलोर हायवै रस्त्यानजीकच अगदी खाडीच्या शेजारीच पुरातन जागृत हनुमान मंदीर वसलेले आहे.मंदीराचा जीर्णोद्धार जरी नव्यानै करण्यात आला असला तरी मंदीरातील मुर्ती ही माञ पुरातन अशी आहे.

एका बाजुला खाडी,मधोमध च कामोठे शहर अन बाजुलाच पुणे बेंगलोर महामार्ग असुन त्याच्या शेजारीच हे हनुमान मंदीर पहावयास मिळतै. पनवेल पासुन कमोठे हे अंतर जवळपास चार किमी आहे. कामोठे शहरात आज जातेवेळीच उजव्या हाताला(वाशी,ठाणे कडे जाणार्या रस्त्यावर अर्थात च खालच्या बाजुला) हे पुरातन मंदीर आहे. मंदीराचे आवार पाहीले असता बाजुलाच खाडी अन मंदिराशेजारी नारळाची बर्याच प्रमाणात झाडे ही आहेत. सदर मंदिर हे पुरातन काळातील असून या मंदीराचा जीर्णोद्धार व बांधकाम हे श्री मुरलीधर शालिक ठाकूर व सौ. बारकूबाई मुरलीधर ठाकूर यांनी दि. २८/०८/२००४ साली स्वखर्चान केलै.

मंदीराचा कळस हा गोल घुमटाकार असुन स्वतंञ गाभारा असलेले हे छोटेखानि मंदिर पहायला मिळते.सोबत च पञ्याच्म शेडच्या आधारे बनवलेला सभामंडप आहे. मंदिर जरी जिर्णोद्धारीत असले तरी पुरातन असल्याचा ठेवा अन माहात्म्य हे त्या मंदिराला भेट दिल्यावर नक्कीच मिळते. पुरातन काळात पनवेल हे एक ऐतिहासिक बंदर असुन बर्याच प्रमाणात येथे मालांची खाडिमार्गे ये जा होत होति,अशा पनवेल नगरीत खुप पुरातन अन प्राचीन अशि मंदिरे आजही आपल्याला पहायला मिळतात. मुळात संशोधक भुमी असेल तर आपण राहत असलेल्या स्थानिक ठिकाणी बर्याच ऐतिहासिक गोष्टीची शोधाशोध आपण करुन शकतो,अन ते गरजेचे आहेच,कारण हा वारसा आपण जपला नाहि तर हळूहळु यांच अस्तित्व हे धोक्यात येईल.

Sunil Sanas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here