महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मातृशिल्प

By Discover Maharashtra Views: 1192 1 Min Read

मातृशिल्प –

आई म्हणजे आंगणातील तुळस , आई म्हणजे मंदिराचा कळस. भटकंती म्हंटलं की आनेक ठिकाण डोळंयासमोर येतात. गड किल्ले, मंदिर ,वाडे ,विहिरी समाधी, लेणी, निर्सग याठिकाणी केलीली उनाड पण डोळसपणे असलेली भटकंती. जे काही चांगल आहे ते डोळसपणे बघा व  नजरेने कॅमेरात टिपा.मातृशिल्प.

डोंगरद-या ची भटकंती नंतर पावल जेव्हा देवदर्शनासाठी मंदिरात जातात तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारा पासून , प्रदक्षिणा मार्ग, कळस सभामंडप ,गाभारा, मंडप  यावर आनेक प्रकारची शिल्प पाहायला मिळतात. कामशिल्प ,मैथुनशिल्प ,सुरसुंदरी प्राणी ,कथापट आणि बरेच प्रकारची शिल्प या मध्ये आसतात. ही दगडी शिल्प कोरण्या मागे काही तरी प्रयोजन नक्की आसत.

मंदिरावर असलेली शिल्पे ही नीट पाहीला असता त्यामागे थोडापार इतिहास लपलेला असतो. मंदिरावर आनेक भावमुद्रा कोरलेले शिल्प असतात. यातील एक शिल्प म्हणजे मातृशिल्प. या शिल्पांमध्ये स्तनपान , कडेवर , मांडीवर घेतलल बाळ इत्यादी भाव असलले शिल्प आढळतात.

मंदिरांवरील आनेक शिल्पां मधील सोमेश्वर मंदिरावरील ( रांजणगाव ) येथील एक मातृशिल्प.

संतोष मु चंदने. चिंचवड.

Leave a comment