महेश्वर म्हणजे शिल्पकलात्मकेची सुंदर सफर

महेश्वर

महेश्वर म्हणजे शिल्पकलात्मकेची सुंदर सफर –

लोकमाता अहिल्या देवी होळकर यांनी महेश्वर खुप सुंदर रीतीने वसवले आहे.  तेथे एकूण 48 मंदिरे व 2100 शिवलिंग आहेत. 3 मोठ्या बारव. पण एक असे समजले की बारवचे कनेक्शन बागलाणशी आहे त्यामुळे आनंद गगनात मावत नव्हता.. पुढे त्यावर लिहिणारच आहे..महेश्वर गावात 12 बलुतेदारांच्या स्वातंत्र गल्ल्या आहेत.  पैकी सुवर्णकार समाज तुलनेने जास्त आहे.  पूर्वी पूर्ण गावाला कोट होता पण आता फक्त काही भागात शिल्लक राहिला आहे.  राजवाडा तसेच मंदिर परिसरात प्रचंड स्वच्छता आणि  लोकांच्या बोलण्यात कमालीची नम्रता आहे.  सकाळी 6 वाजेपासून मंत्रोच्चारण सुरू होते.   त्यामुळे वातावरण मधुर वाटते.. सर्वात महत्त्वाचे तेथे कुठलीही लूट नाही.. त्यामुळे आपण बिनधास्त फिरू शकतो.. मंदिरावरील शिल्पकला इतकी अद्भुत आहे की त्या सर्व शिल्पी व राज्यकर्त्यांना मनापासुन सलाम… ! येथील सहस्रार्जुन,  विश्वेश्वर, पंढरीनाथ, राम मंदिर विशेष बघण्यासारखे आहेत.  तसे तर सर्वच मंदिरे भारी आहेत. राजवाड्यात तोफ लक्षवेधी आहेत.   तेथील handloom नक्की बघा.  एक से एक कलाकृती आहेत.  मुक्ताबाई पानसे यांची छत्री तर निव्वळ अप्रतिम कलाकृती.

तुम्हाला महाराष्ट्रातून महेश्वर जायचे असल्यास –

धुळे- शिरपूर- धामनोद पर्यंत जा. धामनोद हून ,  महेश्वर, मंडलेश्वर, बडवाह, ओंकारजी  करता सकाळी  7 ते रात्री 9:30 पर्यंत  बस मिळतात.  धामनोद हून महेश्वर 14 km  आहे.  साधारण 🚌  भाडे 25 रुपये घेतात.  महेश्वर मध्ये सर्व जेवणाच्या हॉटेल्स गावा बाहेर आहेत त्यामुळे अगोदरच जेवण आवरून घ्यायचे.  गावात मंदिरा जवळ खुप सारे लॉज आहेत.  मी राजवाड्याच्या अगदी जवळ राज पॅलेस मध्ये होतो. तेथील मालकांचे सटाणा नाते निघाल्यामुळे तर खुप सुखदायक क्षण होता.  तुम्ही कधी गेलात तर तेथेच रहा..

माहेश्वर मध्ये पेढे उत्तम मिळतात.., मध्य प्रदेशात बटाट्याला बटला म्हणतात त्यामुळे बटला सर्वच जेवणात मोठ्या प्रमाणात आढळतो.  राजवाड्यात काही सिनेमांचे चित्रिकरण नियमित चालू असते.  राजवाड्याचे रूपांतर  हेरिटेज होटेलमध्ये झाल्यामुळे एका रूम चे भाडे साधारण 18000/- रुपये आहे.  त्यामुळे तेथे शाही ट्रिटमेंट मिळत असणार यात शंका नाही. एकंदरीत माहेश्वरला एकदा नक्कीच जाऊन या. तुम्ही तरुण पणी जेवढे फिरू शकतात तेवढे म्हातारपणी नाही बघू शकत.. कारण खुप पायर्‍या आहेत.

-रोहित  जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here