महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मागोवा

By Discover Maharashtra Views: 1213 2 Min Read

मागोवा –

स्मरण,चिंतन,वाचन,शोधक नजर,भटकंती अन बरच काही,विचार करायला गेल तर तंतोतंत एकमेकांशी सलोखा करुन जीवन जगण अन संबंधीत गोष्टीचा मागोवा घेण हे कुणालाही जमत नाही,त्यासाठी स्वताला त्या  गोष्टित झोकून द्याव लागत,पडताळणी करावी लागते,वाचन कराव लागत,अगदी त्याच्याशी बोलायला ही लागत,तैव्हाच कूठतरी त्यांच्या त्यागाचा,बलिदानाचा,ऊन,वारा,अन पाऊस यांचा कित्येक वर्षे मारा खात स्वताच्या संघर्षाची कहाणी सांगण्यासाठी  प्रत्येक वाटसरूना खुणावत असलेल्या,फक्त नि फक्त इतिहासाच्या पोटातून जन्म घेऊन,स्वताच्या अस्तित्वाची साक्ष देण्यासाठी अन सर्वानी त्याकड आत्मियतेने त्यांची विचारपुस करावी अशा हेतूने कित्येक दगडी चिरे, समाधीस्थळे, वीरगळी, सतीशिळा, धेनुगळ, गद्देगळ या प्रवास करत असताना आडवाटेवर आपल्याला खितपत पडलेल्या अवस्थेत आढळून येतात….

काही स्वताची ओळख असून ही दुर्लक्षित आहात,काहीना नवसंजीवनि मिळाली आहे,तर काही अदृश्य स्वरुपात असुन प्रत्येक भटक्याची तळमळीने वाट पाहत आहैत,सांगायच तात्पर्य एवढ च की जगण अनुभवताना निसर्गाच्या छायेत जरी आपण वावरत असलो तरी जगण्याचा मार्ग हा जरी “सह्याद्री” असला तरी सह्याद्री आपल्या अंगाखांद्यावर बरेच अवशेष बाळगून आहे,सदर ठिकाणांना भेट द्या, त्यांना स्पर्श करा,त्यांच्याशी बोला,त्यांच्याशी एकरुप होउन त्यांच अस्तित्व जाणा,त्यांच्यासाठी जगणार्या मावळ्यांचा पराक्रम जाणुन घ्या,तेथील माती कपाळी लावा अन नामघौषात त्यांचा जयजयकार होऊ द्या,त्यांनाही वाटू द्या कि संघर्षा जरी अटळ असला तरी आपले वंशज ही आपली परिकथा संपुर्ण जगास सांगावयास अजूनही समर्थ आहेत,अजूनहि त्याच हातात तीच धमक अन तीच रग आहे जी आपल्या पुर्वजांच्या हाती अन मस्तकि होति हे पटवून द्या…

काहि स्पर्श हे नेहमीच आठवणीत राहणारै असतात,त्यांना नेहमी जपा.

तूर्तास…..!!

सुनिल आनंदा सणस

Leave a comment