कोड्याचा माळ

कोड्याचा माळ

कोड्याचा माळ…

सांगली पासून साधारणत: 30 किलो मिटर अंतरावर असनार तासगाव तालुक्यातील योगेवाडी हे छोटस गाव. हे गाव मणेराजूरी या गावा शेजारी आहे. या गावाची खास बात म्हणजे येथे असनारा कोड्याचा माळ. येथे दगडांची मांडणी करुन एक कोडं तयार केल गेल आहे. ह्या कोड्या मुळेच ह्या माळा चे नाव ‘कोड्याचा माळ’ असे पडले आहे. हे कोडं आज पर्यांत कोणाला सुटल नाही. या कोड्यात माणूस गेला की आतच फिरतच बसतो.

याच्या निर्मीती विषयची एक दंत कथा अशी आहे की फार फार वर्षा पुर्वी एक तमाश गिरीन होती. तिच्या नादाला दोन सावकार लागेले होते. ते आपापसात तिला मिळावण्यासाठी भांडत होते. हे पाहून तिने त्यांस हे कोड घातल. आणि सांगितल जो कोण आधी हे कोड सोडवेल त्याची मी होइन. आणि जो पर्यंत त्यांच हे कोड सोडवून होत नाही तो पर्यंत लग्न न करण्याच वचन दिल आणि घेतल. म्हातर पर्यंत ते दोघे हे कोड सोडवत बसले पण त्याना हे कोड काही सुटल नाही. आता हे तिघे ही या जगात नाहीत पण त्याच्या या प्रेमी त्रिकोणाच चिन्ह आजून योगेवाडीत आहे.

असही म्हणल जात की, ती दगडं बाजूला काडून ठेवली तर ती परत दुसर्या दिवशी तेथेच येवून बसतात. जो कोण हे कोडे सोडवेल त्याच नशीब फळफळेल. पण एकदा त्या कोड्यात गेला की ते पुर्ण करुनच बाहेर यावे लागते. आर्ध्यातूनच मागे आल्यास त्याच्या मागे पिडा लागते. आमवस्येच्या रात्री तर लोक तेथून जावयास घाबरतात. यासगळ्या भाकड कथा जुण्या लोकांनी कदाचीत त्याच्या मनोरंजनासाठी केल्या असतील. पण त्या लोकांच डोक किती सुपीक होत याच हे ज्वलंत उदाहरण आहे. मी स्वत: त्या स्थळाला भेट देवून ते कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला पण आत गेल्या वर आतच फिरत राहते बाहेर येत नाही. फार मजेशीर आणि कुतुहलात्मक स्थळ आहे. एकदा तरी अवश्य भेट द्या.

माहिती साभार – पुरातन वाडे व गढी फेसबुक ग्रुप

1 COMMENT

  1. साहेब हे कोडं मणेराजुरी गावच्या हद्दीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here