महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,455

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ४ | असहकार आंदोलन

By Discover Maharashtra Views: 2501 3 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ४ | असहकार आंदोलन –

महात्मा गांधींनी सत्याग्रह आंदोलन उभारून राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्य चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेचे परिणाम खानदेशात सुध्दा झाले. आधीच भिल्ल समाज आणि शेतकरी समाजाने या सरकारविरोधात बंडाची सुरुवात केली होती. टिळकांच्या आंदोलनात आणि सुशिक्षित वर्गही  जागरूक झाला होताच.वकिल वर्ग जो काॅंग्रेस पक्षात सक्रिय सहभाग घेतला होता हे सुरवातीला बघितले. गांधीजींच्या आंदोलनाने या प्रवाहात परीसिमीत राहिलेला बहुजन समाज सामिल झाला.विविध स्तरांतील व्यापारी, दुकानदार, तरूण मंडळी, शेतकरी सामिल झाले.राष्ट्रीय प्रवाहात आले असे म्हणायला हरकत नाही. खिलाफत प्रकरणास राष्ट्रीय आंदोलनाचे स्वरूप मिळाल्याने मुस्लिम लोकही  सहभागी झाले.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ४ | असहकार आंदोलन)

सन १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे सुजाण लोक नाराज होतेच. जळगाव येथे ही खिलाफत चळवळीला पाठिंबा आणि प्रसार झाला.या आंदोलनामुळे मुस्लीम नेते राष्ट्रीय आंदोलनात सहभागी झाले आणि हिंदू मुस्लिम ऐक्य प्रत्ययास आले. जळगावचे मीर शुक्रुल्लाह मीर फर्जतअली  यांच्या सारखे राष्ट्राभिमानी नेते पुढेही हयातभर काॅंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते राहिले. पुर्व खानदेश जिल्हा कॉंग्रेसचे ते काही वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी हिंदू मुस्लीम बंधुभावासाठी महाराष्ट्रात दोनदा दौरा केला. मीर साहेबांचे मुळ घराणे नेपाळमधील बस्ती जिल्ह्यातील होते.त्यांच्या वडिलांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला होता. आंदोलकांचा १८५८ मध्ये पराभव झाल्यानंतर ते   जळगाव येथे स्थायिक झाले होते. ( प्रेमा कंटक, सत्याग्रही महाराष्ट्र)

सत्याग्रहातून स्वराज्य आंदोलनाची मुंबई येथे एक ऑगस्ट १९२० रोजी सुरवात करताच जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळू लागला. तरूणांना आकर्षण वाटत होतेच, काही कर्मठ टिळकवादी अपवाद वगळता सर्वच टिळकवादी सुध्दा, प्रेरीत होऊन प्रचाराला लागले.  नागपूर काॅग्रेस १९२० पासून दास्ताने यांनी शंकर राव देव आणि इतर नेत्यांबरोबर दौरा केला आणि प्रचाराचे माध्यम म्हणून सत्याग्रही नामक नियतकालिक सुरू केले.

असहकार आंदोलनात वकिलीचा व्यवसाय त्यागणारे दास्ताने आणि अलिबागचे माधवराव आर. गोसावी हे दोनच वकिल होते.

स्वदेशी आणि अस्पृश्यता निवारण याबरोबरच सरकारी शाळांवर बंदी, राष्ट्रीय शाळांची निर्मिती, मद्यपान निषेध, विदेशी कापडाची होळी,खादीचा प्रसार, टिळक स्वराज्य फंडाची मोहीम हे कार्यक्रम उत्साहात होऊ लागले.

गांधीजींनी तयार केलेल्या कॉंग्रेसच्या संविधानानुसार पुर्व खानदेश जिल्हा कॉंग्रेस समिती नागपूर ठरावानंतर स्थापन करण्यात आली. अमळनेर येथील शाळेने सरकारी अभ्यासक्रम त्यागून राष्ट्रीय शिक्षण देण्यास प्रारंभ केला. राष्ट्रीय शाळा स्थापनेच्या कार्यक्रमानुसार जळगा, भुसावळ आणि अमळनेर येथे राष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या. या काळात उत्तम शिक्षकांची जे उदात्त हेतूने प्रेरित होउन काम करत अशा शिक्षकांची पिढीच तयार झाली. यात जळगाव जवळचे पिंपराळे शाळेतील गोपाळराव वाळुंजकर, देवकीनंदन नारायण,वि.ग.कुलकर्णी तर भुसावळ येथील शाळेत दास्ताने,ना.मा.गोखले,तर अमळनेर येथील शाळेत गोखले गुरुजी हे होते.या शाळांना आश्रम, किंवा उद्योग मंदिर असेही म्हणत. १९२१ मध्ये गांधीजींनी पूर्व खानदेश, नाशिक, सोलापूर असा दौरा केला आणि पुर्व खानदेशातील चळवळीला चालना मिळाली.

या आंदोलनास जोर मिळाला तो १९२०-२२ या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जळगाव, भुसावळ आणि अमळनेर हे शिक्षणाने सजग झाले होते तरी चोपडा,चहार्डी,असोदा, नशिराबाद,टेहु ,यावल,रावेर, किनगाव,न्हावी, फैजपूर या भागातील लोकांनी कारावास भोगला आणि आंदोलन सक्रिय ठेवले. पुढे १९३०,३२,३३,४१,१९४२ पर्यत सक्रिय सहभाग घेतला.

दास्ताने, देवकीनंदन नारायण, बाळकृष्ण रमाकांत देशपांडे,निळकंठ, गणेश साने, दत्तात्रय गणेश काळे,यांचेसारखे कार्यकर्ते निर्माण झाले.

माहिती साभार –

Leave a Comment