महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खांदेरीचा रणसंग्राम भाग ३

By Discover Maharashtra Views: 3725 7 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग ३

खांदेरीचा रणसंग्राम भाग ३ – काही दिवस दोन्ही बाजूने शांतता ठेवण्यात आली. इंग्लिश नाविक दल समुद्रात तळ ठोकून उभं होत. आणि खांदेरीवर तटबंदी बांधणीच काम जोरात सुरू होत. ११ सप्टेंबरच्या सुमारास दौलतखान आपल्या काही शिबाडांसह चालून येणार आहे अशी हवा उठवली गेली. अनेक दिवस नागाववरून रसद घेऊन बोटी आल्या नव्हत्या. नंतर दोन दिवस वातावरण कमालीचं बदललं. पावसासोबत वारा जोरात वाहत होता. वातावरण अगदी अंधुक झालं होतं. काहीही दिसणं कठीण होत होतं. तेव्हा काही सांकेतिक खुणा खांदेरी वरून थळच्या दिशेला केल्या गेल्या पाहिजे. कारण १५ सप्टेंबर नंतर मराठ्यांनी रसद पुरवठा पुन्हा सुरू केला.(खांदेरीचा रणसंग्राम भाग ३)

अंधुक वातावरणाचा मराठ्यांनी फायदा घेण्याचे ठरवले. रात्री अचानक नागावच्या खाडीतून काही लहान बोटी बाहेर पडल्या. काही अंतर गेल्यावर त्यांनी बोटीवरचा दिवा विझवून टाकला. आणि खांदेरी वर दिसणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने वल्हे मारले जात होते. दातओठ चावत खलाशी वल्हे मारत होते. मराठ्यांच्या लहान बोटी जलद होत्या. लहान असल्याने शत्रूला चकवणे ह्यांना सोप्प होतं. पण शत्रू सुद्धा प्रबळ होता. इंग्लिश नाविक दल मधेच नांगर टाकून होत. त्यांना टाळून पुठे निघायचं होतं. इंग्रजांच्या नाविक दलाला आपण टाळून पुठे आलोय हे लक्षात आल्यावर बोटीवरील लोकांनी सुस्कारा सोडला. नंतर मात्र हे प्रकार सर्रासपणे घडू लागले. मूळ बेटावरून रात्रीच्या बोटी बाहेर पडत आणि रसद पोचवून परत येत. इंग्रजांच्या मोठी जहाज ह्या लहान बोटींच्या पाठलाग कऱण्यात कुचकामी ठरतं होती. मिंचिन ने ही गोष्ट पत्राद्वारे मुंबईला देखील कळवली होती.

“At noons, the weather being somewhat clearer, wee see three shibarrs(शिबाड) under the island, and presently see them under saile and as wee judged, coming toward us, but the weather presently going haze, we lost sight of them.”

“Sir, be assured wee are not idle in endeavouring their hindrances and were it in our power they should finde it soe, but these little creeping boats deceive us to admiration when we have nimble boats of the like nature wee hope they shall not escape us soe.”

ह्या अश्या वातावरणामुळे आता इंग्रज सैल पडू लागले होते. तरी कॅप्टन मिंचिन आपल्या लोकांना धीर देत होता. आता ह्या दलात रिव्हेंज आणि सोबतीला तीन शिबाड असा लवाजमा इंग्रज बाळगून होते. रिव्हेंजवरील कॅप्टन मिंचिन मोहिमेची धुरा सांभाळत होता. तर ह्यूझ आजारी पडल्याने त्या जागी कॅप्टन थॉर्प ची नेमणूक झाली. जे सहजशक्य वाटत होतं त्या कामाला बराच उशीर होत होता. थॉर्पने एकदा रात्रीचा फायदा घेत बेटावर उतरायचा प्रयत्न केला पण खांदेरीवरच्या प्रकाशात त्याच जहाज आलं. म्ह्णून तिथून त्याने माघार घेतली.

थॉर्प ह्या सगळ्याला वैतागून गेला होता. त्याला आता हे सगळं लवकर संपवायचं होत. हा चुकार शत्रू सुमद्रात आपल्याला खिळवून ठेवतोय हे त्याला सहन होत नव्हतं. अनेकदा तर तो दारूच्या अंमलाखालीच असे. त्यात एक घातकी निर्णय थॉर्पने घेतला. बेटावर उतरून खांदेरी बेटं आपण ताब्यात घेऊ असा विश्वास त्याला होता. त्याने आपल्या सैनिकांना तयार केलं. मिंचिन त्याला जहाजावर भेटायला आला तेव्हा त्याने आपण बेटावर उतरायचा प्रयन्त करणार असल्याचं सांगितलं. मिंचिनला ही गोष्ट मान्य झाली नाही. दोघांमध्ये बरीच खलबत झाली. मिंचिनने त्याला विरोध करत कंपनीच्या नियमांचं पालन कर म्हणून सांगितलं. हे सांगितल्यावर थॉर्प ऐकेल असं त्याला वाटलं पण तो निघून गेल्यावर दारूच्या नशेत बुडालेल्या थॉर्पने तेच केलं जे त्याला करायचं होतं. त्याने आपलं जहाज खांदेरीच्या दिशेने वळवलं. मराठे मोर्चे धरुनच होते. रात्रीसुद्धा करोल पहारा सुरू होता. इंग्लिश जहाज आपल्या दिशेने येतंय हे पहऱ्यावर असलेल्या मावळ्यांनी हेरलं. दोन्ही बाजूला एकच गडबड उडाली.

बेटावर मायनाकाला खबर देण्याला एक पाहेरकरी धावला. खोपट्याबाहेरूनच त्याने आवाज दिला.
“नाईक, ओ नाईक”
काय झालं,
“ओ शत्रू चाल धरून येतोय बघा.”
मायनाक घाईघाईने किनाऱ्यापाशी आला. तोफा ठासून घेण्याचा हुकूम देण्यात आला. प्रत्येकाने आपली जागा घेतली. मायनाकाने शत्रू जवळ येत नाही तोपर्यंत तोफा डागू नका म्हणून सांगितलेलं. थॉर्प ने जहाजावरून गोळे उडवले पण इथे मराठे आडोसा घेऊन लपले होते. फार काही नुकसान मराठ्यांच्या बाजूच झालं नाही. पण पुढे येतायेता थॉर्प इतका पुढे आला की आता तो मराठी तोफखान्याचा समोर होता. मराठ्यांनी तोफांना बत्ती दिली. आता खांदेरी वरून मराठ्यांनी तोफांचा मारा केला. हा मारा अगदी नेमक्या जागेवर झाला. शत्रूला परत फिरण्याचा वेळ दिला गेलाच नाही. एका जबरदस्त माऱ्यानंतर इंग्लिश शिबाडाच मोठं नुकसान झालं होतं. काहींनी समुद्रात उड्या घेतल्या. मायनाकाने लगेच त्या जहाजाचा ताबा घेयला माणसं पाठवली आणि ते इंग्लिश शिबाड खांदेरीच्या किनाऱ्यावर ओढून घेण्यास सांगितले.

इथे मिंचिन ने हा सगळा गदारोळ ऐकला. दोन्ही बाजूने त्याला तोफेचे आवाज आले. झाल्या प्रकारची कल्पना येयला त्यांला वेळ लागला नाही. त्याने लागलीच एक शिबाड मदतीला पाठवायचे ठरवले. सगळे सैनिक एकत्र करून जहाज सज्ज करून पाठवण्यातही आलं. पण ते सुद्धा अर्ध्यावरून च माघारी आलं. त्या जहाजावर कॅप्टन नॅश होता. त्याने मिंचिनला आपण जहाज गमावलं असल्याचं सांगितलं.

I heard both great and small shott ply out of our boats upon the shoare, i presently imagining that this rash man had attempted to land upon the lsland, seeing them likewise play their great and small shott from shoare. I presently mannd my boate and send all the englishmen i had to assist them, but before they got to them i see two of our shibarrs coming towards me, SARJANT NASH, when he come on board, tould me the sad news of the losses of shibarr that LIEUT. Likewise of the death of L. THORPE

इथे जहाज ओढून घेतक्यावर मराठ्यांनी त्याचा पूर्ण ताबा घेतला. स्वतः थॉर्प ह्या माऱ्यात मारला गेला. अनेक लोक बंदी करून घेतले. गरजेचं समान काढून घेण्यात आलं. डौलकाठी काढून घेण्यात आली. जहाजावरच्या तोफा काढून त्या खांदेरी वर चढवण्यात आल्या. अश्या रीतीने ह्या प्रसंगात पाहिली चकमक घडून आली होती. ह्यात मराठे सरस ठरले होते. इंग्रजांचे फक्त जहाजांच नुकसान झालं नाही तर मोठं मनुष्यबळ सुद्धा ह्या चकमकीत बळी पडलं होतं.

क्रमशः खांदेरीचा रणसंग्राम भाग ३

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English records.

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

खांदेरीचा रणसंग्राम भाग १

खांदेरीचा रणसंग्राम, पूर्वार्ध

Leave a comment