महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खांदेरीचा रणसंग्राम भाग १४

By Discover Maharashtra Views: 3635 4 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १४

खांदेरीचा रणसंग्राम भाग १४ – प्रत्येक वेळी खांदेरीवरील ब्रिटिश सविस्तर माहिती आपल्या मुंबईच्या अधिकाऱ्यांना देत होते. मुंबईचे अधिकारी सुरतेच्या मुख्य कार्यालयाला हि माहिती देत. आतापर्यंत खांदेरी हे प्रकरण पूर्णपणे इंग्रजांची डोकेदूखी ठरत होत. यात फायदा कमी आणि नुकसान जास्त हेच जास्त होत होत. पण तरीही इंग्रजानी त्यावर अधिकार गाजवण्याचा निर्णय बदलला नाही याचे कारण खांदेरी भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा भाग होता आणि हा भाग स्वराज्यात जाणे जे मुंबईच्या संरक्षणाच्या दृष्टीने धोक्याचे होते. मराठ्यांचा साम्राज्य विस्तार दिवसेंदिवस वाढत होता. आणि हेच इंग्रजांच्या दृष्टीने धोक्याची लक्षणे होती. ज्या मुंबईवर इंग्रज अधिकार गाजवत होते त्याच्याच शेजारी मराठे उभे ठाकले होते कल्याण भिवंडी तर स्वराज्यात होतीच पण सोबतच सागरी मार्गावरहि मराठे आता स्वतःचा अधिकार प्रस्तापित करत होते.

By our last we wrote you our intent of planting our boates at Nagoun Rivers mouth; they could not remove from Hendry Kendry until the moone went downe least they should be discovered from the Maine; the enemies galvetts tooke the same time to goe from the Island , and being quicker in rowing , were arrived at Nagoan before our Vessels , and got in. There were some grabs at the rivers mouth that fired at our boates severall guns but did not hurt. Our people finding their design frustrated retreated to us againe in the morning , which which troubles us extremly to be thus dissapointed. This night wee have ordered 5 boates to lye very near to Island, 3 to the northward and 2 to the southward , to prevent their relief.

कॅप्टन केजवीन आपला अहवाल पाठवतो त्यात तो लिहितो ,

आमच्या नागवाच्या तोंडाशी ठेवलेल्या होड्या किनाऱ्यावरून पाहिल्या जाण्याच्या भीतीने चंद्र खाली जाईपर्यँत निघू शकल्या नाहीत. शत्रूच्या होड्याही त्याचवेळी किनाऱ्याकडे निघाल्या होत्या. परंतु त्यांची वल्ही आमच्यापेक्षा अधिक त्वरेची असल्यामुळे त्या निसटून नागावच्या खाडीत शिरल्या. तेथील कित्येक गुराबांनी आमच्यावर तोफा डागल्या. परंतु त्यात आमचे मात्र काही नुकसान झाले नाही. अशा रीतीने आम्ही जो बेत ठरवला होता तो मात्र पुन्हा एकदा फसला. आता रात्री बेटावर मदत पोहचू नये यासाठी मात्र आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या लहान सरपट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने फसवतात. तशाच चलाख होड्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. आजच्या रात्री आम्ही ५ बोटी बेटाच्या जवळ घेऊन जाण्याच्या विचारात आहोत. ३ बोटी उत्तरेला आणि २ बोटी दक्षिणेला तयार ठेवण्याची योजना आहे.

रात्री बेटावर गेलेल्या होड्यांना इंग्रजांनी हलू दिलेले नाही. रात्री नागावच्या मुखाशी आधीप्रमाणे इंग्रज येतील अशा अपेक्षेने मराठ्यांनी १२ गुराबा ठेवल्या होत्या. त्या सकाळी फिरून आत गेल्या. ३ नोव्हेंबर ला मराठे आणि इंग्रजांमध्ये गॅल्वेटवर आणि बेटावर गोळागोळी झाली. लढाई सुरु असलेली पाहून काही गुराबा बाहेर आल्या परंतु इंग्रजांची मचवे आणि शिबाडे त्यांच्याजवळ आल्यामुळे ते काही मराठ्यांजवळ जाऊ शकले नाहीत. त्यामुळे होणारे युद्ध मात्र टळले . मराठ्यांची गलबते चलाख होतीच इंग्रजांच्या लहान होड्या खराब असल्यामुळे प्रत्येकवेळी मराठ्यांची सरशी होत होती. इंग्रजानी ३ माणसांची एक होडी पकडली होती. त्यातील प्रवासी मुंबईचे असल्याचे सांगत होते म्हणून मग इंग्रजांनी त्यांना मुंबईकडे कैदी म्हणून रवाना केले.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग १४

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

खांदेरीचा रणसंग्राम सर्व भाग

Leave a comment