महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,504

खांदेरीचा रणसंग्राम भाग १३

By Discover Maharashtra Views: 3708 4 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १३

खांदेरीचा रणसंग्राम भाग १३ – Last night wee birtht our shibarrs and manchaus at Nagoun rivermouth in hopes of meeting with some of their vessels going in our out but wee had not the fortune of meeting with any, although the boates which were at the Island went out in the night, but wee think they went to the northward .There is this day gone into nagaun River 19 small boates that come from the Southward. Now savagees people have seen the new moone wee expect them, but if they intend to come to us againe wee shall be vigilant for their presentation , and carefull in all other your occations , to the utmost of our powers.(खांदेरीचा रणसंग्राम भाग १३)

कॅप्टन केजवीन मुंबईकरांना आपापल्या २७ ऑक्टोबर च्या पत्रात लिहितो काल रात्री नागावच्या मुखाशी दाब धरून आमची गलबत तयार आहेत. पण या योजनेचा काहीच उपयोग झाला नाही असे दिसते. आज दक्षिणेकडून आलेल्या १९ लहान होड्या नागाव नदीत शिरल्या आहेत. शिवाजी महाराजांचे सैन्य आमच्यावर चालून येण्याचे प्रयत्न करतील असे दिसते. त्यांच्या या हालचालीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. गरज पडल्यास आम्ही आमच्या सामर्थ्याची जाणीव त्यांना नक्कीच करून देऊ

मराठे रोज बेटावर मदत पोहचवीत होते याचा त्रास इंग्रजांना कायम होत होता. ते त्यांच्या प्रत्येक पत्रात याचा उल्लेख करताना दिसतात. मुंबईकर इंग्रजांनी केजवीन ला जादा मदत पाठविली होती पण त्याचा उपयोग मात्र काही झाला नाही. केजवीन आपल्या २८ ऑक्टोबरच्या पत्रात लिहितो कितीही काळजी घेतली तरी रात्री १६ ते १७ होड्या बेटात जातात. या लहान होड्या आमची नजर चुकवून बेटावरील दिव्यांच्या खालून चटकन जातात. तारीख ३० ऑक्टोबरची हवा वाईट होती. यामुळे आमचे थोडे नुकसान झाले. त्यांचेही बरेच नुकसान झाले असावे. त्या रात्री आम्ही शिबाडे व मचवे नागाव खाडीच्या मुखाशी शत्रूच्या गलबतांना अडविण्याकरिता पाठविणार होतो. परंतु ते अद्यापि आलेच नाहीत. होड्या अद्यापि बेटावरच आहेत. आज रात्री त्यांच्याकरीता दबा धरून राहून आम्ही त्या पकडू अशी आशा आहे. गुराबा अद्यापि नागावच्या खाडीतच आहेत. तुमच्या आज्ञेप्रमाणे हेक्टर गुराब परत पाठविली आहे. पाणी पाठवा नाही तर आम्हाला तुटवडा पडेल. तुम्ही जर आमच्यासाठी गॅल्व्हवेटे आली तर बेटाच्या तटबंदी वर हल्ला करता येईल.

सुरतकर मुंबईला सांगतात खांदेरीवर हल्ला केल्यामुळे आपल्या समर्थ शत्रूचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत आपल्याला असमर्थता आली आहे. शिवाजी महाराजांकडून नुकतेच सामोपचाराचे राजापूरच्या मुक्कामावरून पत्र आले आहेत. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांना सामोपचाराचे उत्तर द्या असे सुरतकर इंग्रज मुंबईकरांना सांगतात. खांदेरीसारख्या शूद्र व राजाच्या दर्जाला न शोभणाऱ्या बेटावर तटबंदी करण्याचा व्यर्थ आग्रह धरून आम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला अशी तक्रार शिवाजी महाराजांकडे करा अशी माहिती सुरतकर इंग्रज देतात.

शिवाजी महाराजांना पात्र लिहिताना डेप्युटी गव्हर्नर ने आपल्या पत्राच्या आरंभीच झालेल्या प्रकाराबद्दल खेद दाखवून कायमच्या मित्रत्वाची इच्छा प्रदर्शित करावी असे सुरतकर लिहितात. आणि त्यानंतर येणारा पैसा , त्यांच्या मुलुखातून दळणवळण स्वातंत्र्य मिळवून घेण्याबाबत हि माहिती द्या. कैद्यांची सुटकेबद्दल विषयहि आणावा. आणि शेवटी खांदेरीचा विषय शिवाजी महाराजांकडे काढावा.

न्यू इंग्लंड गलबत खांदेरीजवळ ठेवण्याची सूचना सुरतकरांनी मुंबईकरांना केली होती.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग १३

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment