केळवे किल्ला | Kelve Fort

केळवे किल्ला | Kelve Fort

केळवे किल्ला | Kelve Fort

केळवे किल्ला – पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरा वरुन समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेला समुद्राकडे तोंड करून उभे राहीलो की उजवीकडे जाणारी एक ठळक वाट दिसते. दाट सुरुच्या वनातून जाणारी हि वाट पाच मिनिटांत दाट सुरूच्या वनात लपलेल्या केळवे किल्याकडे नेते.

किल्ला अगदीच छोटा आहे. किल्ल्याचा आकार चांदणी प्रमाणे असून त्याचे बुरुज त्रिकोणाकृती आहेत. केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता पण डॉ. श्रीदत्त राउत यांच्या मार्गदर्शना खाली किल्ले वसई मोहिमे अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे.

किल्ला वाळूत गाढला गेला असल्यामूळे प्रवेशद्वारातून रांगतच आपण किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर तटबंदी व त्याच्या मधोमध दुसरे प्रवेशद्वार दिसते. त्यातून वाकून आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या भागात पोहोचतो. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफाचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. आता वरचाच भाग नजरेस पडतो. इ.स.१७३९ च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here