कावजी कोंढाळकर एक योद्धा

unknown hero | कावजी कोंढाळकर

कावजी कोंढाळकर एक योद्धा

१६६१ च्या जानेवारी महिन्यात, महाराजांनी कोकणात उतरू पाहणार्या कारतलबखान या मोगली सरदाराचा धुव्वा उडविला आणि दक्षिण कोकणात मुसंडी मारली. ही कोकण मोहीम स्वराजासाठी फारच यशस्वी ठरली, पण जवळजवळ पाच महिने मराठी सैन्य या मुलुखात अडकून राहिले. या संधीचा फायदा उठवत शाइस्तेखानाने १६६१ च्या मे महिन्यात कल्याण काबीज केले आणि नंतर देइरीगडास वेढा घातला. या वेढ्याची जबाबदारी शाइस्तेखानाने सरदार बुलाखीवर सोपविली होती.महाराजांनी हा वेढा उठविण्यासाठी कावजी कोंढाळकर ची रवानगी केली. कावजी कोंढाळकरांच्या मराठी सैन्याने मुघलांचे तब्बल चारशे सैनिक मारीत देइरीगडाचा वेढा उधळून लावला.याचा संदर्भ आपल्याला शि.प.सं मध्ये सापडतो.

आता प्रश्न राहतो तो म्हणजे, हा कावजी कोंढाळकर कोण?
हा संभाजी कावजी कोंढाळकरअसेल (अफझलखान युद्धाच्या वेळेस मर्दुमकी गाजविणारा) का? तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे, कारण संभाजी कावजी या दरम्यान शाइस्तेखानास मिळाला होता.हा कावजी मल्हार (शिरवळचे ठाणे काबीज करणारा) असेल का? याचे उत्तर सुद्धा नाही कारण कावजी मल्हार यांचे पूर्ण नाव कावजी मल्हार खासनीस असे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here