करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)

कन्टेन्ट | गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ ३ ४ ५ ६ ७ | मौर्य सत्तेचा उदय | गड कसे पाहवे | संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर | जावळी मोहीम ६

करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) –

करवीर संस्थानाचे तिसरे छत्रपती, शिवाजी राजे हे शरीफजींच्या वंशातील शाहजीराजे भोसले ह्यांचे पुत्र माणकोजी भोसले होत, हे खानवटकर घराण्यात इंदापूर परगण्यात जन्माला आले. करवीर छत्रपती संभाजी महाराजांना एक कन्या होती. त्यामुळे महाराणी जिजाबाई(छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी) ह्यांनी मानकोजींना दत्तक घेतले. माणकोजींना दत्तक घ्यावे अशी छत्रपती संभाजी महाराजांचीच इच्छा होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूवेळी (२० डिसेंबर १७६० रोजी) त्यांचा दुसऱ्या पत्नी राणी कुसाबाई गरोदर होत्या. त्यांचा पोटी कन्यारत्न जन्माला आले. नंतरच्या काळात गादीच्या वारसा संबंधी अनेक अडथळे आले पण महाराणी जिजाबाईंनी माणकोजींना २२ सप्टेंबर १७६२ रोजी दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण करून शिवाजी हे नामाभिधान ठेवले. त्यानंतर पाचच दिवसांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर सिंहासनारूढ केले. (करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे))

कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर सुमारे पन्नास वर्षाचे संघर्षमय जीवन वाट्याला आले. ह्या कालखंडात पेशवे, पटवर्धन, सावंतवाडीचे भोसले, निपाणीचे देसाई, इचलकरंजीचे घोरपडे या सर्वांशी अनेकदा निकाराच्या लढाया झाल्या. सुरवातीची अकरा वर्ष त्यांना महाराणी जिजाबाई ह्यांचे मार्गदर्शन लाभले. महाराणी जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या(दुसरे) कारकिर्दीतच छत्रपती संभाजी महाराजांचे पंचगंगेच्या तीरी देवालय बांधले. ह्या देवलायासाठी ३० हजार रूपये खर्च झाला.

करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) ह्यांनी प्रत्यक्ष लढाईत सुद्धा सहभाग घेतला होता. महादजी शिंदे ह्यांचा बरोबरच्या युद्धप्रसंगी ते कोल्हापुरातच होते. ह्यांच्याच कारकिर्दीत इंग्रजां बरोबर एकूण तीन करार झाले पण इ.स. १८१२ रोजीच्या करारात करवीर राज्याला सार्वभौमत्व गमवावे लागले. करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) ह्यांनी पद्दाळे तलाव बांधून विस्तीर्ण केला.ह्याच कालखंडात राजधानी किल्ले पन्हाळ्याहून कोल्हापूर शहरात स्थलांतरित झाली

छत्रपतींची कारभारी मंडळी :-

१) आबाजीराव पंडित प्रतिनिधी.
२) भगवान पंडित – मुख्य प्रधान.
(प्रधान पदावर असे कोणी नव्हते पण केशवसुत भगवान पंडित असा शिक्का राजपत्रावर केला जात होता.)
३) सुब्बाराव पंडित अमात्य.
४) भास्करराव चिटणीस
५) रामचार्य पंडितराव मांगलेकर.
६) राणोजीराव घोरपडे सेनापती.
७) रत्नाकरराव राजाज्ञा.

वयक्तिक आयुष्य :-

करवीर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे चौदा विवाह झाले. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-

१) सईबाई – तुळजोजीराव घाटगे सर्जेराव कागलकर यांची कन्या.
२) चिमाबाई – राणोजीराव शिंदे चावरेकर यांची कन्या.
३) अर्कवृक्ष –
४) सकवारबाई – लक्ष्मणराव शिंदे सेनाखासकील तोरगलकर यांची कन्या.
५) उमाबाई – मुकुंदराव पवार देसाई जांबोटकर यांची कन्या
६) सुंदराबाई – रत्नोजीराव खानविलकर यांची कन्या
७) अहिल्याबाई – राणोजीराव घटक सर्जेराव यांची कन्या
८) आनंदीबाई – जानराव पाटणकर यांची कन्या
९) मैनाबाई – लक्ष्मणराव शिंदे सेनाखासकील तोरगलकर यांची कन्या.
१०) गंगाबाई – अथणीकर देसाई यांची कन्या.
११) दयाबाई – सयाजी घाटगे मुरगूढकार यांची कन्या.
१२) सकवारबाई – खंडेराव शिंदे कौलकर यांची कन्या.
१३) आनंदीबाई – धोंडजीराव पाटणकर यांची कन्या.
१४) कमळजाबाई – लिंबाजी नाईक – निंबाळकर वैरागकर यांची कन्या.

करवीर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे ह्यांना एकूण आठ अपत्ये होती.

१) युवराज संभाजी राजे उर्फ आबासाहेब – महाराणी सुंदराबाईंच्या पोटी जन्म
२)शहाजीराजे उर्फ बुवासाहेब -” राणी कमळजाबाईंच्या पोटी जन्म.
३) आऊबाई – यशवंतराव घाटगे सर्जेराव कागलकर यांचेशी विवाह.
४) बाळाबाई – सुलतान रावजी निंबाळकर खर्डेकर यांचेशी विवाह.
५) बायजाबाई – नारायणराव घाटगे बाजी नागपूरकर यांचेशी विवाह
६) येसूबाई – सिधोजीराव नाईक निंबाळकर निपणकार यांचेशी विवाह.
७) चिमाबाई – नागोजीराव पाटणकर यांचेशी विवाह.
८) आकूबाई – लक्ष्मणराव शिंदे यांचेशी विवाह.

सलग अर्धे शतक राज्य करून छत्रपतींनी दक्षिणी महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम किनारा इत्यादी प्रदेशात चांगला दरारा बसविला होता. शूर आणि धोरणी असून कर्त्या व पराक्रमी लोकांना संग्रही ठेवण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती. ह्याच कारणामुळे त्यांना बलाढ्य अशा साम्राज्याना टक्कर देता आली.

करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) ह्यांचे २४ एप्रिल १८१३ रोजी निधन पावले.

संदर्भ :-
कोल्हापूर छत्रपती घराण्याचे कागदपत्रे
करवीर रियास्त
फोटो साभार – गुगल

चेतन (फेसबुक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here