महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,670

विदर्भातील अष्टविनायक भाग 2

By Discover Maharashtra Views: 1319 3 Min Read

विदर्भातील अष्टविनायक भाग 2 –

३ : वरदविनायक गणपती, गवराळा –

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभार्‍यात आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे. मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी.(विदर्भातील अष्टविनायक भाग 2)

भद्रावती गावी निवासी असलेल्या या गणेशाची स्थापना गुत्समद नावाच्या प्रज्ञावंत ऋषीने केली आहे. नाग संस्कृतीचे दैवत असलेल्या या भद्रनाथाचे मंदिर आजही येथेच आहे. हा परिसर पुष्पक वन म्हणून ओळखला जात असे. या वनातच गुत्समद ऋषींचे वास्तव्य होते. मात्र, इतर ऋषींनी अनौरस म्हणून त्यांची अवहेलना केली. त्यामुळे त्यांनी गणेशाची आराधना आरंभली. गणपती प्रसन्न झाल्यावर त्याची इथेच प्रतिष्ठापना केली. भद्रावती दक्षिणेला निसर्गसंपन्न अशा टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिराला हजारो वर्षांची परंपरा आहे. ती गणेशमूर्ती द्विभुज आहे.

नागपूरपासून 130 किलोमीटर अंतरावर भांदक (प्रचलित नाव भद्रावती) असून टेकाडावर श्रीगणेशाचे मंदिर आहे. टेकडीवर उभे राहिल्यास डावीकडे विष्णु आणि उजवीकडे यक्षमूर्ती दिसते. मुख्य मंदिरात 16 स्तंभ असून उमामहेश्वराची मूर्ती आहे. काही वर्षांपूर्वी मंदिर कोसळले आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने पुन्हा त्याची उभारणी करण्यात आली. अडीच मीटर उंच आणि 1.10 मीटर रुंदीच्या या मूर्तीवरही शेंदुराचे थर असून मंदिर परिसरात मोठया संख्येने प्राचीन मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. त्यापैकी काही नागपूरच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मूर्तीच्या दोन्ही हातात मोदकपात्रे आहेत. ही मूर्ती वाकाटकांच्या काळातील असावी, असा अंदाज आहे.

(फोटो- प्रकाश मांजरेकर)

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, चंद्रपूर, बल्लारशा, नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, वरोरा आणि चंद्रपूरहून सतत बससेवा उपलब्ध.

४ : एकचक्र सिध्दिविनायक, केळझर –

नागपूर-वर्धा राष्ट्रीय महार्माग क्रमांक 3वर वर्धा जिल्ह्यात केळझर देवस्थान असून मोगलांच्या काळात या गावाला विशेष महत्त्व आले. गोंड राजा कोकशाहकडून खंडणी वसूल करण्यासाठी मोगलांच्या सैन्याचे मुख्यालय केळझरमध्ये असल्याचे संदर्भ ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतात. महाभारतातील बकासुराच्या संदर्भात केळझरचा उल्लेख सापडतो. अलीकडच्या काळापर्यंत गणेशाच्या मंदिरात रेडयाचा बळी देण्याची प्रथा सुरू होती. मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. साधारण सव्वा मीटर उंचीची गणेशमूर्ती शेंदूरव्याप्त आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून इतर बारकावे शेंदुरामुळे दिसत नाहीत. ही मूर्ती नृत्याच्या मुद्रेत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

विदर्भातील अष्टविनायक भाग 2 | वरदविनायक गणपती, गवराळा

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.

Leave a comment