afjal khan

?जिवा महाला – Jiva Mahala?
?अपरिचित मावळे ?


होता जिवा म्हणून वाचला शिवा.
स्वतःच्या जीवावर उदार होत ज्याने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता, महाराजांवर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला ज्याने यमसदनाला पाठवला आणि इतिहासात ज्याचा पराक्रम ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीने नोंदवला गेला त्या जीवा महालाची दखल भारतीय टपाल खात्याने घेतली असून ‘वीर जिवाजी महाला – शिवाजी महाराजांचे अंगरक्षक’ या नावाने पोस्टाचे विशेष पाकिट प्रकाशित केले आहे.


जीवा महाला …जिवबा महाला यांच्याबद्दल न जाणणारा असा कोण आहे ज्याला माहिती नाही,
श्री शिवछत्रपतींच्या प्रमुख मावळ्यापैकी एक असे हे जीवा महाला !! या मावळ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जिवबा महाला संकपाळ असे होय, प्रतापगडावरील महाराजांचा पराक्रम तर सर्वश्रुतच आहे त्यामुळे मी तुम्हाला त्या पराक्रमाचे विश्लेषण सांगण्यापेक्षा इथे प्रेषित असलेल्या जिवबा महाला यांच्याबद्दल सभासद बखरीत असलेले प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन आणि जिवबा महाला यांचा पराक्रम सांगत अर्थात देत आहे :-
छत्रपतींनी उजवे हातचे बिचव्याचा मारा चालवून खानची चरबी बाहेर काढली व चौथरीयाखाले उडी घालोन निघोन गेले..इतक्यात सैदबंडा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राजियावरी चालविले.तो राजियाने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.

जिवा महाला – Jiva Mahala


पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिऊ महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्बंडीयास वार केला.
तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.”आणि याच प्रतापगडावरील पराक्रमामुळे “होता जीवा म्हणून वाचला शिवा” अशी उक्ती प्रचलित झाली. अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एका निष्ठावंत मावळ्याची दखल घेण्याची ही घटना पोस्टाच्या आणि देशाच्याही इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे जिवा महालाच्या पराक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. प्रतागपगडावर महाराजांनी गाजवलेला पराक्रम तर सर्वश्रुत आहेच पण, त्या पराक्रमाची गोष्ट ज्याच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा महाराजांचा अत्यंत विश्वासू , शूर अंगरक्षक म्हणजे जिवा महाला. पण तो इतिहासाच्या पुस्तकातच राहिला.


आजही प्रतापगडावर कुठेही जिवा महालाच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी शिळा नाही की स्मारक नाही. जिवा महालाने हातातील ज्या दांडपट्याने सय्यद बंडावर वार केला होता त्या दांडपट्टाचे रेखांकीत चित्रही पाकिटाच्या एका बाजूस काढण्यात आले असून ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सुद्धा या पाकिटावर हिंदी आणि इंग्रजीत लिहिण्यात आली आहे. यामुळे महाराजांच्या एका शूर अंगरक्षकाची ओळख देशाला होईल
अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली….अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा..

छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here