घोडखिंड पावन झाली

Discover-Maharashtra-Post | महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

घोडखिंड पावन झाली

पन्हाळ्यावरुन राजे बांदलसेने सोबत खेळण्याकडे निघाले तेव्हा बाजी महाराजांना म्हणाले-

राजं सुखरूप जा तुम्ही खेळण्यावरी

मी घेतो हे क्रुर सैन्य अंगावरी ॥

खिंड मी लढवुन राहतो चिंता नसावी माझी

गनिम अडवुन धरितो हा बाजी अन् फुलाजी ॥

खेळण्यावर जाऊनी द्या निशानी तोफेची

मग नसेल कसली चिंता मला प्राणाची ॥

तोफेचा आवाज ऐकण्यास असतील कान आतुर

हा बाजी कधीही न होणार स्वराज्याशी फितुर ॥

माझं इमान सदैव राहील राजं तुमच्या चरणी

स्वर्गसुख मिळविल जरी आलं नशीबी मरणी ॥


राजं खिंडीतुन निघाले तोवर खिंडीत गनिम पोहोचला आणि पुढे…

युद्ध जाहले खिंड अडवी बांदल आळी-पाळी

अंग सुन्न झाले सुटती रक्तांच्या धारा कपाळी ॥

बाजींच्या सैतानी पराक्रमाने हैरान होई सिद्दी

खिंडीतला प्रत्येक मावळा बनला तेव्हा जिद्दी ॥

रक्ताचे तळे साचे अन् साचे मृतदेह खिंडीवर

बाजींची नजर अजुनही राजांच्या तोफबत्तीवर ॥

तोफ वाजली हास्य ते बाजींच्या चेहऱ्यावर खुलले

मरणाला बाजींनी अगदी हसत हसत झेलले ॥

बांदल सेनेच्या पराक्रमाची घोडखिंड साक्ष बनली

बाजींच्या रक्ताने आज ती खिंड पावन झाली ॥

सह्याद्री ढासळला कडकडती विजा आकाशी

राजंही गहिवरलं पाहुन बाजींच प्रेम या तक्ताशी ॥

माहिती साभार – मयुर खोपेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here