महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,966

पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

By Discover Maharashtra Views: 4365 4 Min Read

अपरिचित मावळे | पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर…

अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. झाडांच्या आडगळीतून आलेल्या बाणांनी त्यांच्या नऱ्हडीचाच घोट घेतला

शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता आपल्या परिने योजना आखून खानास जेरीस आणावे. ही शिवरायांची ताकीदच होती.

अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.

सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले. सोमाजी मोहिते. सिधोजी निंबाळकर हे देखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुष्मनावर तुटून पडत होते.

समोर येणाऱ्यांची खेर नव्हती. नंतर बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले हे गजराज. मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुता करवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला. आणि महाराजांकडे चालविला.

याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे राजांनी खुश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात थोडी बढती दिली असेलच. साधनांच्या आभावी जास्त माहिती मिळत नाही बेहलोलखाना नंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत

Retribuition Visited the Maratha army very much sooner. jalna, both town and suburb, was thoughly plundered and devastated for four days. Then as the Marathas were retreating, loaded with booty cinsisting of “countless gold, silver, jewwls, clothes, horses, elephants and camels, an enterprising Mughal officer,Ranmast Khan, * attacked their rearguard . Sidhoji Nimbalkar with 5,000 men heald him in check for three days, but was at last slain with many of his men.

राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी ४ दिवस राजेंनी पेठा मारिल्या, शहर लुटून फन्ना केले. जडजवाहीर कापड घोडे हत्ती उंट फस्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्वाचे शहर ते मारिल्या मुळे
मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

हे या पाच हजाराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व करीत होते. अखेर लवकर जेरीस येतील ते कसले मराठे आणि कसला मराठी बाणा कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी रणमस्तखानास सलग ३ दिवस झुंजवत ठेवला अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.

धन्य ते मावळे धन्य त्यांची स्वामीनिष्ठा………

Source –
Shivaji and his time – Jadunath Sarkar
सेनापती संताजी घोरपडे – जयसिंगराव पवार
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
सभासदाची बखर – कृष्णाजी अनंत सभासद
मराठी रियासत – गो. स. सरदेसाई

साभार – इतिहास छत्रपतींच्या मावळ्यांचा

Leave a comment