दोधेश्वर महादेव मंदिर, दोधेश्वर (बागलाण)

दोधेश्वर महादेव मंदिर, दोधेश्वर (बागलाण)

दोधेश्वर महादेव मंदिर, दोधेश्वर (बागलाण)

नाशिक जिल्हयातील सटाणा शहरापासून १० किमी अंतरावर दोधेश्वर येथे महादेवाचे सुंदर मंदिर असून हा परिसर निसर्गसंपन्न आहे.दोधेश्वर महादेव मंदिर.

हे मंदिर डोंगररांगेत गर्द वनराईत लपलेले आहे. आख्यायिकेनुसार पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते त्यावेळी त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे या लिंगास पांडवेश्वरसुद्धा म्हणतात.

मंदिराचे स्थापत्य यादवकालीन आहे. सभागृह त्यांनतर नंदीगृह पुन्हा पायऱ्या उतरून एक यज्ञगृह व पुढे गर्भगृह. गर्भगृहात अंधार असून शिवलिंग पंचमुखी आहे. मुख्य मंदिराच्या वर आणखी एक शिवालय आहे. त्यास मागून मार्ग आहे.

दोधेश्वर महादेव मंदिराच्या मागील डोंगर रांगेत अनेक नैसर्गिक झरे आहेत. याच झऱ्यांपासून दोध्याड नदी तयार झाली. नदीचे दोन प्रवाह तयार झाले एक मुख्य पिंडीत येतो व दुसरा गोमुखातून वाहतो. मंदिराच्या परिसरात स्नानासाठी स्त्री व पुरुषांसाठी अशी दोन वेगवेगळी कुंड तयार केली आहेत.

महादेव मंदिराच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर दोन प्राचीन मंदिरे आहेत. मंदिराभोवतालचे डोंगर हे राज्य राखीव वन क्षेत्रात असल्यामुळे येथे दाट झाडी आहे.

शहरापासून अवघ्या दहा कि. मी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र दोधेश्वर येथे श्रावण महिन्यात अनेक महिला व पुरूष भाविक मोठ्या संख्येने पायी जात असतात.

माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here