महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,683

बिजनेस बुडाल्यावर भजे विकून पुन्हा सुरु केला बिजनेस | धीरूभाई अंबानी

By Discover Maharashtra Views: 3848 5 Min Read

बिजनेस बुडाल्यावर भजे विकून पुन्हा सुरु केला बिजनेस आणि अशा प्रकारे झाले जगातले सर्वात मोठे श्रीमंत…

एक प्रमुख व्यावसायिक आणि रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धीरूभाई अंबानी हे त्या व्यवसायिकांमध्ये सामील आहेत जे स्वतःच्या हिम्मतीवर स्वप्ने पाहतात आणि ते पूर्ण करतात. असे म्हंटले जाते कि धीरूभाई अंबानी यांनी भारतामधील व्यापाराच्या पद्धती बदलल्या होत्या.

कोणालाही कल्पना नव्हती कि एक पकोडे विकणारा सामान्य व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सामील होईल. आम्ही तुम्हाला या लेखामधून धीरूभाई यांची गोष्ट सांगणार आहोत.

धीरजलाल हिरालाल अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी यांचा जन्म (२८ डिसेंबर १९३२ मध्ये) गुजरातच्या एक अल्पवयीन शिक्षकाच्या कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण फक्त हाईस्कूलपर्यंतच झाले होते.

परंतु आपल्या दृढ़ संकल्पाने त्यांनी स्वतःचे विशाल व्यावसायिक आणि औद्योगिक साम्राज्य स्थापित केले. सुरवातीच्या दिवसांमध्ये धीरुभाई अंबानी गुजरातच्या जुनागढ येथील गिरनार पर्वतावर जाऊन तिथे येणाऱ्या भक्तांना पकोडे विकत होते.

तुम्हाला सांगू इच्छितो कि, धीरूभाई अंबानी गुजरातचे एक छोटे गाव चोरवड येथील राहणारे होते. त्यांच्या घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. या कारणामुळे त्यांनी आपले हाईस्कूलचे शिक्षण अर्धवट सोडून छोटी-मोठी कामे सुरु केली.

असे म्हंटले जाते त्यांनी सर्वप्रथम पकोडे विकण्याचे काम सुरु केले. यानंतर ते जेव्हा १७ वर्षांचे होते त्यावेळी ते त्यांचे भाऊ रमणिकलालकडे यमनला निघून गेले. धीरूभाईंचे काम पाहून त्याना फिलिंग स्टेशनमध्ये मॅनेजर बनवले गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्‍या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायर्‍या ओलांडून गेले. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली.

असे म्हंटले जाते कि, त्यांना बिजनेसमधील इतकी माहिती झाली होती कि त्यांनी एका शेखला मातीसुद्धा विकली होती. वास्तविक दुबईच्या शेखला एक गार्डन बनवायचे होते. यासाठी त्यांनी चक्क दुबईला माती पाठवली आणि यासाठी त्यांना पैसेदेखील मिळाले.

धीरूभाई अंबानी यांच्या संबंधी असे बोलले जाते कि, ज्यावेळी ते गुजरातमधील एका छोट्या गावातून मुंबईमध्ये आले होते त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ५०० रुपये होते. नंतर त्यांनी कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य प्रस्थापित केले. १९६६ मध्ये धीरुबाईंनी गुजरात येथील नरोदा मध्ये आपली पहिली कापड गिरणी सुरु केली होती.

व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला.

जिथे त्यांनी अवघ्या १४ महिन्यात १०००० टन पॉलिस्टर यार्न प्लांट स्थापित करण्याचा विश्वविक्रम केला होता. हि कापड गिरणी धीरूभाईंचा टर्निंग पॉईंट ठरली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ज्यानंतर त्यांनी या गिरणीला एका मोठ्या टेक्सटाइल साम्राज्यामध्ये रुपांतर केले आणि आपला स्वतःचा एक ब्रांड विमल लॉन्च केला.

आर्थिक अडचणींमुळे धीरूभाई दहावीच्या पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. परंतु त्यांना हे उत्कृष्ठरित्या माहिती होते कि शेयर बाजाराला आपल्या बाजूने कसे करायचे. इतके कि, प्रसिद्ध बाजार तज्ञसुद्धा त्यांना रुलिंग डी-स्ट्रीट पासून रोखू शकले नाहीत. यानंतर धीरूभाई अंबानी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर रिलायंस इंडस्ट्रीजला शिखरावर नेऊन ठेवले.

धीरूभाई अंबानी यांनी २००२ मध्ये आरकॉम लॉन्च केले आणि रिलायंस समूहाला मोबाईलच्या जगतामध्ये “कर लो दुनिया मुठ्ठी में” या स्लोगन सोबत नव्या उंचीवर नेले. ज्यावेळी धीरूभाई यांनी रिलायंस कम्यूनिकेशनची सुरवात केली त्यावेळी भारतामध्ये अनेक टेलीकॉम कंपन्या होत्या परंतु आरकॉम बाजारामध्ये येताच त्यांनी सर्वांनाच मागे टाकले.

रिलायंसने अवघ्या ६०० रुपयांमध्ये आपला मोबाईल फोन बाजारात आणला. त्यावेळी टेलिकॉम उद्योगात सरकारी कंपनी बीएसएनएल, एअरटेल, हच, आयडिया, टाटा, एअरसेल, स्पाइस आणि व्हर्जिन मोबाईल यासारख्या मोठ्या कंपन्या होत्या. परंतु असे असूनदेखील ते यशस्वी झाले. धीरूभाई अंबानी यांचे असे म्हणणे होते कि, त्यांचे मुख्य उद्देश पोस्टकार्डपेक्षा कमी किंमतीत लोकांना संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.

सोर्स : महा दैनिक आणि विकिपीडिया

Credit – मराठी व्यावसायिक

Leave a comment