देशमुख गढी, राशीन

देशमुख गढी, राशीन

देशमुख गढी, राशीन –

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या गावात ऐतिहासिक काळे देशमुख या घराण्याची गढी आहे. राशीन हे गाव पुणे – सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून २८ कि.मी अंतरावर आहे. गावात काळे देशमुखांची गढी आहे तिची तटबंदी आणि बुरूज आजही मजबूत स्थितीत आहे. पण अर्धा भाग शिल्लक आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागावर नवीन बांधकाम केलेला वाडा आहे. देशमुख गढी या वाड्यात सहकारमहर्षी बापूसाहेब काळे देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. हे घर महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मावशीचे आहे.

गावात असलेले अंबाबाई मंदिर हे पुरातन आहे आणि अनेकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराबाहेर २ समाधी आहेत त्या भोसले घराण्यातील आहे असे स्थानिकांकडून समजले. ते भोसले म्हणजे शहाजीराजेंचे बंधू शरीफराजे भोसले यांच्या घराण्यातील आहे. गावची पाटीलकी भोसले घराण्याकडे आहे तर देशमुखी काळे घराण्याकडे आहे.

राशीन हे पुरातन काळातील गाव आहे. इ.स.७०० मधील विनयादित्य चालुक्य आणि इ.स.८०७ मधील राष्ट्रकुट गोविंद तिसरा यांचे ताम्रपट होते. प्रस्तुत ताम्रपटात राशीनचा “भुक्ती” असा उल्लेख करण्यात आला आहे.यावरुन इ.स.च्या सातव्या शतकापासुन किंबहुना त्याही पुर्वी पासुन दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासात राशीनचे स्थान होते. सातवाहन राजवंशानंतर जो बलाढ्य राजवंश दक्षिणेस झाला त्या बहामनी, चालुक्यांच्या काळात राशीनला “भुक्ती” म्हणुन महत्व प्राप्त झाले. निझामशाहीच्या अस्तानंतर मुघल काळात राशीन येथील पाटीलकी भोसले घराण्याकडे होती. हे भोसले श्री छत्रपती शिवाजीराजे यांचे चुलते शरीफजी भोसल्यांचे वंशज आहेत. शरीफजी त्यांचा मुलगा त्र्यंबकजी हे औरंगजेबांच्या चाकरीत असताना औरंगजेबाने त्यांना भिवथडीकडे रवानगी केले तेव्हापासुन हे घराणे येथेच स्थायिक झाले.

टीम – पुढची मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here