चोळप्पा महाराज वाडा, अक्कलकोट

चोळप्पा महाराज वाडा, अक्कलकोट

चोळप्पा महाराज वाडा, अक्कलकोट –

स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांची सेवा करण्याच भाग्य जर कोणाला लाभले असेल तर ते चोळप्पा यांस. अक्कलकोट मधील स्वामींचा मुक्काम याच चोळप्पाच्या वाड्यात होता. प्रथम अन्नसेवन ही याच वाड्यात चोळप्पाच्या घरात झाले. स्वामींचा अक्कलकोट मधील वास्तव्यातील बराचस वास्तव्य चोळप्पा महाराज वाडा या वाड्यात होते. चोळप्पा हे स्वांमीचे निस्सीम भक्त होते. त्यांची सेवा करताना वेळोवेळी घरच्यांचा रोष ही पत्कारला.

वेळोवेळी स्वामींनी चोळप्पाची कठीण परीक्षाही घेतली.

एकदा स्वामींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले .स्वामी चोळप्पाच्या वाड्यातून हासापूर गावाकडे निघाले तेव्हा चोळप्पा त्यांच्या मागे सावली सारखा जाऊ लागला. तेव्हा स्वामी रागाने त्यास म्हणाले ‘आम्ही सन्यासी माणस  आम्ही कुठेही जाऊ. आपण आपला प्रपंच सांभाळा ; येवढ बोलून स्वामींनी आपल्या पायातील खडवा त्याच्या अंगावर फेकल्या . चोळप्पा रडत रडत व्याकूळतेने म्हणाला स्वामी मी तुमच्या साठी घरदार सोडीन पण तुमची साथ व चरण कधी सोडणार नाही.

स्वामींनी घेतलेल्या परीक्षेवर चोळप्पा पूरेपूर उतरला. स्वामींनी सांगीतली की या पादुकांचे प्रसाद म्हणून पूजन कर. या पादुकांच्या दर्शनाने भक्तांचे व्याधी व संकट निरसन होते. या पादुका आज सुध्दा चोळप्पाच्या वंशजा कडे असून स्वामींच्या समाधी मंदिरात या पादुकांचे दर्शन घेता येते

स्वामींनी वेळोवेळी चोळप्पाच्या वाड्यात राहून अनेक लीला केल्या आहेत. चोळप्पाच्या पत्नीला विंचवाच्या दंशाने होणारा दाह कमी केला आहे. चोळप्पाच्या अखेरच्या क्षणी चोळप्पाला ताप आला व अखेर शके १७९९अश्विन शुध्द नवमीस चोळप्पाचे निर्वाण झाले.  बाळप्पाने त्यांच्या मुखात स्वामींचे चरणजल पाजले. त्या दिवशी स्वामी खूूप उदास होते. तो स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता.

चोळप्पा महाराजांच्या वाड्याजवळच स्वामींच समाधी मंदिर आहे.

चोळप्पा महाराजांच्या वाड्यात  एक विहीर असून तीला कुशार्वत म्हणून आोळखले जाते. तुळशी वृंदावन ,मंदार गणेश  ,शेजघर एकमुखी दत्त व स्वामींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या जागा भक्तांसाठी दर्शनासाठी पाहता येतात. चोळप्पा महाराजांचा हा वाडा आत्ता चोळप्पा महाराज मठ म्हणून सुध्द‍ा आोळखला जातो.

संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here