महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 94,28,995

चाकणची कत्तल

Views: 2
4 Min Read

चाकणची कत्तल –

दख्खनी आणि पठाणी मुसलमानांतील तेढ विको पास जाऊन तिचा स्फोट चाकण येथील कत्तलीच्या स्वरूपानें झाला. त्याची हकीकत थोडक्यांत अशी आहे. हिजरी ८४९ ( शके १७६७) मध्यें अल्लाउद्दीन अहमदशहाच्या कारकीर्दीत सल्फ मलिकतुजार यानें संगमेश्वरबंद हस्तगत करण्याचा विचार केला. याचें कारण त्या बाजूस दाट जंगल असल्यामुळे त्याच्या आश्रयास राहून पुष्कळ चोर व दरवडेखोर छापे घालीत, यामुळे त्या मागांतून जाणाऱ्या येणान्या मुसलमान यात्रेकरूंस नेहमी भय वाटत असे. मलिकनुजारार्ने प्रथम एक किल्ला घेऊन तेथील किल्लेदार शिर्के यास केंद केले, तेव्हां शिर्षांनें मुसलमानी सैन्याशी गोडी लाऊन असें चोलणें चालविले की ” मला इकडील जंगल व प्रदेश याची बारकाईची माहिती आहे. तेव्हां माझ्या बरोबर तुन्ही सैन्यासह याल तर तुम्हांस नेमके संगमेश्वरच्या पायथ्याशीं पोंचवितों; म्हणजे तुम्हास तै बंदर सहज घेतां येईल.” मलिकानें शिक्यांच्या म्हणण्यास मान्यता दिली; आणि सैन्यांतील लोक नाखुष होते तरी त्यांचे म्हणणें न ऐकतां शिक्यांनीं दास-विलेल्या वाटेनें निबिड जंगलांतून व डोंगरांच्या दऱ्या खोऱ्यांतून जातांजाता है मुसलमानी सैन्य एका अत्यंत कठिण जागी येऊन पोंचलें. त्या ठिकाणीं तीस चाळसि हजार हिंदु सैन्य आधीच दबा धरून राहिलें होतें; आणि त्यांच्या तडाख्यां-तून या मुसलमानी सैन्याची सुटका होणे अशक्य झालें. शिवाय मलिक तुजार त्याचवेळी फार आजारी पडला, सारांश हिंदु सौनिकांनीं त्या मुसलमानी सैन्यांतील बहुतेक सैन्याची कत्तल केली. व त्यांत मलिकतुजार व बरेच सय्यद लोक प्राणास मुकले. कांहीं थोडे लोक या प्रसंगांतून निभावले ते मलिकाच्या ठाण्याचे ठिकाण चाकण येथे गेले.(चाकणची कत्तल)

इकडे दक्षिणी सरदारांनी परदेशी सरदारांच्या हेतूविषयीं बादशहाचे मन कलुषित करून शिक्यांच्या प्रसंगांतून यथाऊन चाकणास आलेल्या परदेशी सरदारांची कत्तल करावी असा हुकूम मिळविला होता. त्याप्रमाणें निजामुलमुल्क, राजा रुस्तम व मशीरउलमुल्क हमजा यानीं हिंदु व मुसलमान यांचे मिळून एक मोठें लष्कर चाकणच्या किकुधास वेढा देण्यासाठीं नेलें, त्यावेळीं अस्सल चंशायें १२००। सय्यद व खेरीज १००० परदेशी मुसलमान चाकणच्या किल्ल्यांत रहात होते. दक्षिणी मुसलमानांचें सैन्य किल्ल्याजवळ आलें तेष्टां तडजोडीचें बोलणें सुरू झालें. त्यांत पहिल्या दिवशीं सुरक्षितपणें जाऊं देण्याचा करार करून व आंतील लोकांना आणा शपथा देऊन बाहेर आणले व परत किल्ल्यांत जाऊ दिलें. यामुळे विश्वास पटून दुसरे दिवशीं किल्ल्यांतील सर्व लोक मेजवानीस म्हणून बाहेर आले; आणि त्या प्रसंगी त्यांची दक्षिणी मुसलमानांनीं सपशेल कत्तल केली. ” चाकणच्या कत्तलीचें साल फेरिस्ताच्या मंर्ते शके १३६८; बुन्हाण-इ-मासिरच्या मर्ते १३७६, आणि निजाममुद्दीन अहमदच्या मतें शके १३६७ हे आहे. ही कंसल शाली त्या वेळीं दक्षिणी व हबशी लोकांचा पक्ष अधिकारारूढ होता, आणि नंतर खरा प्रकार सुलतानास कळून आल्यावर दक्षिणी पक्षाच्या हातून सूत्रे काढून घेण्यांत आली.

दौलताचाद तेथील चांद‌मिनारच्या स्तंभावर कोरलेला लेख (ले. ८५) शके १३६७मधला आहे व त्यात हयशी आमलदार त्याठिकाणी असल्याचा उल्लेख आहे. या-वरून चाकणच्या कत्तलीची मिती हीच असावी असें ठरर्ते. * परदेशी पक्ष अधि-कारारूढ झाल्यावर पुनः शरुशीखान यास मलिक तुजार हा किताब मिळून त्याच्या-कडे दाभोळ, जुन्नर, चाकण, पुणें, सुपे व शिश्चल या प्रातांचा इवाला देण्यात आला व याबद्दलचे पत्र (ले. ८६) उपलब्ध आहे. त्या अर्थी शके १३७२ पूर्वी शिरवल परगण्यास त्याचें ठाणें कायम झालें होतें हैं उघड दिसतें. याखेरीज शके १३६८ मध्ये ‘विजापूर, भागानगर, देवगिरी व आमदाबाद बेदर अशा चार तरफा होऊन चार सुभ्यांची रवानगी झाली.

इतिहासाचे एक अपरिचित पान

अमर श्रीरंग साळुंखे.

Leave a Comment