महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,175

महाराणी श्रीमंत बायजाबाई शिंदे !!

By Discover Maharashtra Views: 1535 2 Min Read

महाराणी श्रीमंत बायजाबाई शिंदे !!

बायजाबाई यांचा जन्म कोल्हापूर येथील कागलकर घाडगे घराण्यातील सन १७८४ सालचा.त्यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. महाराणी श्रीमंत बायजाबाई शिंदे या अत्यंत सुंदर व देखण्या होत्या. घोड्यावर बसण्यात त्या अत्यंत पटाईत  होत्या. बायजाबाई शिंदे यांना कित्येक इतिहासकारांनी “दक्षिणची सौंदर्यलतिका”अशी संज्ञा दिली आहे.

अनेक सरदारांनी  सर्जेरावांचे  मन वळवून बायजाबाईंचे लग्न ग्वाल्हेर चे महाराज श्री दौलतराव शिंदे यांच्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी  मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लग्न झाल्यानंतर बायजाबाई या आपल्या पतीबरोबर  लष्करात आणि राजकारणात जातीने लक्ष देऊन राज्यकारभार पाहात  होत्या.

महाराज दौलतराव शिंदे यांच्या मृत्यूनंतर  बायजाबांईनी दत्तक न घेता सर्व कारभार आपल्या हातात घेतला .सरासरी सहा वर्ष (१८२७-१८३३) त्यांची राजकीय कारकीर्द गाजली  होती .परंतु तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी मोठ्या दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालवला. याच कालावधीत त्यांनी ग्वाल्हेर ला भिलसा, बुऱ्हाणपूर, किल्ला ग्वालियर,शेवपूर,सिप्रि ,लष्कर आणि उज्जैन इथे काही नाणी पाडली होती.  या नाण्यांवर त्यांनी हिंदूंचे पवित्र अक्षर “श्री” चा वापर करून किल्ला ग्वालियर, लष्कर आणि सिप्रि येथील टाकसाळीत ही चांदीची नाणी पाडलेली आहेत.

खालील छायाचित्र मध्ये ती नाणी आपल्याला माझ्या संग्रहातून दाखविण्याचे मला आज भाग्य भेटतेय.

पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदे सरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर ग्वाल्हेरच्या राणीसाहेबा बायजाबाई शिंदे यांनीच बांधलेले आहे .

तत्कालीन ‘मुंबई गॅझेटमध्ये,बायजाबाई यांचे जे मृत्यू वृत्त आले त्यात असे  म्हटले होते की ,” बेगम सुमरू ,नागपुरची राणी, झाशीची राणी ,लाहोरची  चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिद्ध स्त्रियांमध्ये ही  राजस्त्रीहि  आपल्या परीने प्रख्यात असून  हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोड्यावर बसून टक्कर दिली होती”.

बायजाबाई  शिंदे यांचे निधन ग्वाल्हेर इथे १८६३ साली झाले. तसेच त्यांची समाधी  कन्हेरखेडला सोळा खांबी पानिपत वीर शिंदे घराण्यातील मातब्बर सरदार यांच्या बाजूला बांधलेली आहे. मराठेशाहीच्या या एका उत्तुंग कर्तुत्वाला मानाचा मुजरा !!

जय भवानी ! जय शिवराय !

@ किरण शेलार.

Leave a comment