भुलेश्वर मंदिर (माळशिरस)
२०१७ डिसेंबर मध्ये भुलेश्वर हे प्राचीन आणि सुंदर असलेले भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेलो होतो. हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण “मंगलगड” असे होते.
सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे.. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.
या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. लढाईच्या काळात बर्याशच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज
तुम्हाला हे ही वाचायला
- पुरातन शिव मंदिर, कोथळी | Ancient Shiva Temple, Kothali
- दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला
- उत्तरेश्वर देवालय कोल्हापूर | Uttareshwar Temple, Kolhapur
- तळजाई माता मंदिर, पुणे | Taljai Mata Temple, Pune
- महाकाय दुर्गादेवी मुर्ती, बाबुपेठ, चंद्रपूर | Durga Devi Murti, Babupeth
- कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३
- कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २