महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,604

भाट्ये बीच, रत्नागिरी | Bhatye Beach, Ratnagiri

By Discover Maharashtra Views: 1654 1 Min Read

भाट्ये बीच, रत्नागिरी –

महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो.  पूर्वेला उत्तुंग असा सह्याद्री तर पश्चिमेला विशाल अरबी समुद्र याच्यामध्ये वसलेला असल्याने रत्नागिरी पर्यटन स्थळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात. रत्नागिरी जिल्हाला १६७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून या किणार पट्टीवर अनेक पर्यटन स्थळे पहायला मिळतात. या ठिकाणचे भाट्ये बीच सुंदर व स्वच्छ आहेत.

रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भाट्ये  बीच आहे. बीच पांढऱ्या वाळूचा असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. या समुद्र किनार्‍यावर सुरू चे वन असून याठिकाणी वनभोजनाचा आनंद घेता येतो. समुद्रकिनारा शांत, उथळ, स्वच्छ असल्याने पर्यटक समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटतात.  मावळतीच्या सूर्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक पर्यटक सायंकाळच्या वेळी बीच वर गर्दी करत असतात. या समुद्र किनाऱ्याच्या टोकास झरी गणपतीचं सुप्रसिद्ध मंदीर आहे.

माझी भटकंती

Leave a comment