भारतीबुवा मठ, तुळजापूर | सारीपाट

भारतीबुवा मठ | सारीपाट

भारतीबुवा मठ | सारीपाट –

तुळजापूर हे महाराष्ट्रातील  अद्य शक्तिपिठ. या तुळजापूरात मंदिरा सोबत आनेक मठ ,आखाडे पण निर्माण झाले होते. यात शाक्त’ शैव, वैष्णव ,नाथपंथी यांचे मठ आहेत . या मठात गोसावी लोक राहतात .त्यांच्या पंथा प्रमाणे ते देवी तुळजाभवानीची पूजा करतात. गोसावी  प्रकारा मधील  गिरी गोसावी व भारती गोसावी यांचे मठ आहेत. यात तुळजापूर मधील महत्वाचा मठ म्हणजे भारतीबुवा मठ.

भारतीबुवा गोसावी मठ हे देवीचे माहेरघर मानले जाते. हा मठ एक भव्य गढी सारखा असून मठाला भव्यप्रवेशद्वार व त्यावर नगारखाना आहे. चार बुरुज असून ऊंच तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. या मठाची स्थापना ज्यांनी केली ते मठाधिपतीं रणछोडदास भारती यांची समाधी या मठात आहे. या भारतीबुवा मठाचे आनेक मठाधिपती होउन गेले. त्यातील मुख्य गोसावी म्हणजे रणछोडदास भारती , गणेश भारती व गोविंद भारती .

या भारतीबुवा मठाच्या आत मध्ये कुंड ,विहीर व भुयार आहे. या मठ‍ाचे वैशिष्ठ म्हणजे फार पूर्वी पासून चालणार अन्नछत्र . तुळजापूरात येणारा कोणीही भाविक ,पांथिक ,यात्रिक या मठात अन्न ग्रहण केल्या शिवाय जात नव्हता. अस म्हणतात की या मठाची चूल कधी बंद पडली नाही. या मठाच्या नावावर आनेक एकर मध्ये जागा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पण या मठाला दान पत्र दिले आहेत.

नवरात्रात देवीचे घट बसण्यआधी एक दिवस आधी येथे घट बसतात. या मठात देवी तुळजाभवानीचे मंदिर असून तिची पुजा अर्चा मठा मार्फत केली जाते. या भारतीबुवा मठाच आणी तुळजाभवानीच सबंध म्हणजे आख्यायिका नुसार देवी  रोज रात्री या मठात भारतीबुवां बरोबर सारीपाट खेळण्यासाठी येते. या भारतीबुवाच्या मठात असणा-या  भुयारातून देवी आत येथे व तेथे असलेल्या विहिरीत स्नान करून देवी सारीपटास बसते असे तेथे सांगीतले जाते.

येथे रोज रात्री सारीपाट मांडला जातो. देवी जेव्हा रात्री  सारीपाट खेळायला येते तेव्हा ती इतकी रममाण होते की तीला परत बोलवायला सकाळी तुळजाभवानी मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारातून देवीला रोज हाक मारली जाते.तेव्हा देवी परत माघारी फिरते. त्या नंतर देवीची पुजा चालू होते.

रात्री मांडलेला सारीपाटातील सोंगड्यात बदल झालेला दिसतो अशी भाविकांची भावना आहे. या मठात हा सारीपाट रोज मांडला जातो . त्या सारीपटाच्या दर्शनला भाविक व नवीन लग्न झालेले जोडपे देवीच्या दर्शन‍‍ा नंतर येथे न चुकता जतात. तेथे जाऊन देवी कडे मागण करतात  की माझ्या संसाराचा व आयुष्याचा सारीपाट निट रंगू दे.

या भारतीबुवाच्या मठ मंदिरापासून २ कि. मी असून येथे थेट गाडी जाते. किवा मंदिराच्या पश्चिमे कडील द्वाराने पायरी मार्गांने चालत जाऊ शकता. जास्त लोकांना अपरिचित असल्याने फारसे लोक येथे जात नाहीत. लग्न झाल्यावर आनेक जण कुलदैवत तुळजाभवानीच्या दर्शन‍‍ाला जातात. तिचा अर्शिवाद घेतात. त्या प्रमाणेच लग्न झालेल्या जोडप्याने या मठात जाऊन सारीपटाच दर्शन घेण तितकच महत्वाच आहे.

संतोष मु चंदने. चिंचवड पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here