तुळजापूरातील बारलिंग मठ

By Discover Maharashtra Views: 3518 1 Min Read

चंद्राबाबू नायडूनी गुरुस्थानी मानलेला तुळजापूरातील बारलिंग मठ…

प्राचीन काळी तुळजापूरमध्ये वस्ती करण्याचे काम येथील मठांनी पार पाडले. त्यानुसार याठिकाणी नाथपंथीय आणि दशनाम गोसायाचे मठ आहेत. पैकी बारलिंग मठ हा नाथपंथीय असून येथे बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आल्याने श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते.
या मठाचा देवीच्या सेवेत प्रत्यक्ष कुठलाही सहभाग नाही, तरीपरंतु बारलिंग मठाचा परिसर तुळजाभवानी मंदिराच्या छ्त्रपती शिवाजी महाराज महाद्वारच्या खालच्या बाजूस खोल दरीत आणि घनदाट झाडीत असल्याने येथे पूर्वी नाथपंथीय गोसव्यांचा वावर होता. मठ डोंगराच्या पायथ्याला असल्याने एक पाऊस झाला की, डोंगरातील पाणी तेथील महादेवाच्या पिंडीभोवती वाहायला लागते.

या मठाचे माठाधिपती हे खासकरून उत्तर भारतीय असल्याचे दिसून येते. त्यानुसार महंत गोविंदनाथाच्या निधनानंतर बारलिंग मठाच्या गादीवर पंजाब च्या जालोर जिल्ह्यातील शर्मा घराण्यात जन्मलेल्या अम्मानी वयाच्या 16 व्या वर्षी नेकनाथ हे नाव धारण करून बारलिंग मठाचे महंत होण्याचा मान मिळविला. अम्मा तब्बल 125 वर्षापेक्षा जास्त दिवस जगल्या.त्यांचे वैशिष्ट म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना हेलिकॉप्टर पाठवून हैद्राबादला नेले होते.

तुळजाभवानी मंदिराच्या एका दरीमध्ये बारालिंग मठ असून येथे १२ ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे डोंगरपायथ्याल…..

माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a comment