महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,526

भाला | कुंत

By Discover Maharashtra Views: 1510 4 Min Read

भाला | कुंत –

भाला प‍ोलादा पासून बनलेल त्याच पात टोकदार, रुंद, दुधारी व टोकाकडे निमूळत होत ज‍ाणार शस्त्र. संस्कृत मध्ये याला कुंत म्हणत. भाला सोयीच उपयुक्त व प्रभावी हत्यार असल्याने आनेक शतकांपासून याचा वापर केला जात होता. मराठयांच हे आवडत शस्त्र होत. साधारण पणे सहा ते सात फूट उंचीचे लांब भाले असतात. लढाई बरोबर शिकारीत पण याचा उपयोग केला जात आसे. भाला चा फाळ ज्या बांबूत बसवत त्या बांबूला ‘बांसडा’ म्हणत. असा बंसडा तोडून आणलाकी त्या बांबूची मशागत करायची.

महाराष्ट्रात बांबूची, वेळूची बेटे भरपूर. भरीव बांबू पिवळसर झाला की तो लांबलचक बघून  तोडून आणला की पालापाचोळ्यात ठेऊन पालापाचोळा पेटवून दिला की भाजल्याचे डाग उठले की तो बाहेर काढायचा. गरम असतानाच बाक असेल तर काढायचा. बांबूच्य‍ा वरच्या टोकाला तेलाची शेंबीदार नळी बसवून त्य‍ात तेल भरून स्वयंपाक घरात वरच्या ब‍ाजूला टांगून ठेवत . चुलीवरच्या धुर आणी तेल प्यायल्याने बांबू एकदम पक्का झालाच समजा. वाकेल पण तुटणार नाही आशा बांबूत मग तासूनतुसून भाल्याचा फाळ बसवला जाइ.

भाला बनवण्याची पध्दत सारखी असली तरी हे भाले युध्दात कोण वापरणार आहे यावर त्याची जडणघडण अवलंबून असायची. यावरुन भाल्याचे प्रकार पडले आहेत.

युध्दात हे भाले घोड्यावरुन हत्तीवरून , पायदळ वापरायचे या वरून अश्वकुंत गजकुंत व पदातीकुंत हे प्रकार आले. पायदळातील सैनिक जे भाले वापरीत ते ‘पदातीकुंत’. या भाल्याची पाती जाड व रुंद असत. घोड्यावरचा सैनिकाच्या भाल्याला ‘अश्वकुंत म्हणत.  घोड्यावरील सैनिक वेगाने दौडत येउन भाला भोसकायचा. त्यासाठी भाले लहान व थोडे लवचिक असायचे. वजनालाही कमी असायचे. हत्तीवरून चालवले जाणारे भाले हे ‘गजकुंत’ असत , हे  मात्र लांब असत. राजाचा भाला हा ‘वल्लभ’ नाव असे.

भरीव बांबून पासून तयार करण्यात आलेल्या भाल्याचे ‘एक अबजी’ व ‘दुअबजी’ दोन प्रकार पडत. बांबुच्या एका टोकाला फाळ असल तर ‘एक अबजी’ तर  एका बाजुला  फाळ  व दुस-य‍ा बाजूला प‍ोल‍दाच  अणुकूचीदार मजबूत टोक ( याला ‘पायदान’ म्हणत.)असे भाले ‘दुअबजी’ म्हणत . हे भाले युध्दात सोयीस्कर पडायचे. अशा भाल्यांनी पुढून व मागून चाल करुन येणा-या शत्रू वर वार करता येत असे.

शस्त्र चालवणा-यांच्या फलटणी असत. अशा फलटणीत भाला चालवणारे पायदळात पहिल्या फळीत असत. या भाल्यांबरोबर काही निशाणीचे ही भाले असत. कोणतही निशाण काठीवर लावल की त्याच्यावर भाल्याच पात असलच पाहीजे ही पध्दत होती.

काही भाले हे’ मानाचे भाले’ होते. दरबारात सिंहासनाजवळ , मिरवणूकीत धार्मिक विधीच्या वेळी भाला घेउन उभे राहाण्याचा मान काही घराण्यांकडे होता. त्यांना ‘भालदार ‘ म्हणत. हे भाले उच्चप्रतीचे , मोठे  व नक्षीदार असत. काठीवर वस्त्र गुंडाळलेले असे. राजवाड्याच्या दरवाजावर , बालेकिल्यावर , गस्ती देणारे व पाहरेकरी यांच्या हातात भाला पाहायला मिळतो. पालखी व मेण्या सोबत असणारे ही लोक भाला सोबत ठेवत.

श्रीमंत यशवंतराव होळकर यांची कन्या भीमाबाई या उत्तम घोडा चालवीत अन भल्याभल्यांना ती  भालाफेकीत भारी पडली होती असे इतिहासात लिहल गेल आहे. या भाल्यांचे ‘वार’ व ‘पवित्रे’ वेगवेगळे आहेत. यात कंकणवर्त व परिघवर्त पवित्रे आहेत. कानावर ,पायावर ,पोटावर, डोक्यावर , छाताडावर ‘असे निरनिराळे ‘वार’ आहेत.

मराठयांच्या इतिहासात शस्त्रास्त्रे अशी होती की जेथे गवतास देखील ‘भाले’ फुटतात. काही भाले माझ्या संग्रहातील.

संतोष मु चंदने. चिंचवड

Leave a comment