महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री बाणेश्वर मंदिर, बाणेर

By Discover Maharashtra Views: 1873 2 Min Read

श्री बाणेश्वर मंदिर, बाणेर –

डोंगरातील कठीण असा खडक खोदून तयार केलेली गुहागृहे म्हणजेच लेणी. नाशिक जवळच्या पांडवलेण्यात लेण हा शब्द प्रथम आलेला दिसतो. लेण हा शब्द संस्कृत लयन या शब्दावरून आला आहे. सबंध भारतात आज माहीत असणारी सुमारे हजार एक लेणी असून त्यातील नऊशे महाराष्ट्रात आहे. याचे कारण असे की लेणी खोदण्यासाठी आवश्यक असणारा एकसंधी व कणखर असा दगड महाराष्ट्रातला सह्याद्री व्यतिरिक्त अन्यत्र क्वचितच आढळतो. महाराष्ट्रात असणाऱ्या लेण्यांमधील एक लेण आज बाणेर सारख्या गजबजलेल्या आणि चारी बाजूंनी विकसित होणाऱ्या परिसरात  अजूनही आपली ओळख टिकून आहे.(श्री बाणेश्वर मंदिर, बाणेर)

बाणेर रस्त्यावरून बालेवाडी फाट्यावर डाव्या हाताला एक रस्ता जातो. त्यावरून पुढे गेल्यावर थोडया अंतरावर डाव्या हाताला आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण श्री बाणेश्वर मंदिर रात पोचतो. हे मंदिर म्हणजे एक लेणी समूह आहे. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी बाणेश्वराची स्थापना केली, अशी अख्यायिका आहे.

पुरातत्व खात्यानुसार हे लेणे इ.स. पूर्व १२०० वर्षातील  आहे. मंदिरात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते. समोर छोटेसा सभामंडप आहे. डाव्या बाजूला असलेल्या वाटेने आपल्याला जावं लागत. तिथे मंदिर परिसरात सापडलेल्या वीरगळ एकत्र करून ठेवल्या आहेत. त्या वीरगळ १२ व्या शतकातील आहे.  पुढे आपल्याला एक बारमाही पाण्याचा स्रोत पाहायला मिळतो. त्याच्या पुढे मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील शिवलिंगाची स्थापना केलेली दिसते. समोर सुंदर कोरीव काम केलेला नंदी आहे. गाभाऱ्याला लागून असलेल्या जागेत सध्या देवळाचे सामान ठेऊन ती जागा बंद केली आहे. शेजारी गणपतीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे.

पत्ता :
https://goo.gl/maps/hggyvrTsmCAsnHd46

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment