औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा

औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा

औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा –

औरंगजेब स्वराज्यात आला त्यावेळी त्याचा मूळ उद्देश छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारणे हाच होता. त्यासंबंधित एक नोंद आपणास ४ डिसेंबर १६८४ रोजीच्या औरंगजेबाच्या दरबाराच्या नोंदीत आढळून येते.(औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा)

मराठ्यांच्या आश्रयास आलेला अकबराने आपले वकील मर्यम मुघलानी व मुहमद्द मुह्सीन यांना औरंगजेबाकडे पाठविले. औरंगजेबाने अकबराविषयी चौकशी केली. वकील मर्यम मुघलानी व मुहमद्द मुह्सीन यांनी मोगलांकडेच राहावे व त्यांचा खर्च शेख अब्दुल्ला याने करावा अशी आज्ञा झाली . संभाजी महाराजांच्या वकिलांनी औरंगजेबाशी तह करण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारी अर्ज केला. परतू औरंगजेबाने तो अर्ज बघितला नाही. औरंगजेबाने हुकुम जारी केला कि “ या काफरबच्चाशी ( संभाजी महाराज ) तह फक्त तलवारीनेच केला जाईल. “ वकिलांना परत जाण्याचे परवाने देण्याची आज्ञा दिली. मलिक शहा याने वकिलांना गाझीउद्दीनकडे घेऊन जावे. वाटेत त्यांना कोणीही अडथळा करू नये. वकिलांनी तेथून संभाजीकडे जावे.

आदिलशाही व कुतुबशाहीचा पाडाव केल्यानंतर औरंगजेबाचा एकमात्र उद्देश संभाजी महाराजांचा विनाश करणे हा होता. औरंगजेबाचा अधिकृत इतिहास मआसिर – ए –आलमगिरीतील १६८८ च्या एका नोंदीत संभाजी महाराजांविषयी असलेली औरंगजेबाच्या मनातील चीड व घृणा आणि उद्देश दिसून येतो. नोंद पुढीलप्रमाणे “ बंडखोर व अस्वच्छ काफिर संभाला धडा शिकवणे ( शिक्षा करणे ) .”

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :- औरंगजेबाच्या दरबाराचे अखबार :- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ , पत्र क्र. ५२३

मआसिर – ए –आलमगिरी :- अनुवाद रोहित सहस्त्रबुद्धे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here